spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Uran Murder Case: ‘तुमची दहशत दाखवा’, Sharmila Thackeray यांचे पोलिसांना आवाहन, Navi Mumbai Police आयुक्तांची घेतली भेट

उरण येथील यशश्री शिंदे हत्याप्रकरणानंतर (Uran Murder Case) राज्यभरात खळबळ उडाली असून नागरिकांनी महिला सुरक्षेवरून संताप व्यक्त केला आहे. २५ जुलै रोजी बेपत्ता झालेल्या यशश्री शिंदे या २२ वर्षीय तरुणीचा मृतदेह पनवेल रेल्वे स्थानकाजवळ झाडीत आढळला. आरोपी दाऊद शेख याने हि हत्या केल्यावरून नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होत आहे. अश्यातच नवी मुंबई पोलिसांनी आरोपी दाऊद शेख याला अटक केली आहे. हत्येनंतर फरार झालेल्या आरोपीला हत्येच्या पाच दिवसांनंतर कर्नाटक राज्यातून अटक केली आहे. याप्रकरणा वरून महाराष्ट्रातील वातावरण तापलेले असतानाच आज (मंगळवार, ३० जुलै) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी नवी मुंबई पोलीस (Navi Mumbai Police) आयुक्त मिलिंद भारांबे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ‘तुमची दहशत दाखवा’ अश्या शब्दांत पोलीस कारवाईच आवाहन केलं आहे.

यावेळी माध्यमांशी संवाद साधत त्या म्हणाल्या, “उरणमध्ये वीस वर्षांच्या मुलीच्या बाबतीत जो भीषण प्रकार घडला आहे किंवा गेल्या काही दिवसांत महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत, त्या संताप आणणाऱ्या आहेत. आणि माझी पोलिसांना विनंती आहे की, अशा प्रकरणात तुमच्यावर कोणी दबाव आणणार नाही पण जर कोणी दबाव आणायचा प्रयत्न केला तर त्याला न जुमानता आरोपीना फाशीची शिक्षाच मिळेल हे पहा. आज आम्ही पोलिसांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून या बाबतची मागणी केली आहे. कायद्याचा धाक नसला की अशा गोष्टी होतात. आणि म्हणूनच माझी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पण विनंती आहे की, गेली १० वर्ष शक्ती कायदा पारित झालेला नाही, जो लवकरात लवकर करावा.”

त्या पुढे म्हणाल्या, “प्रत्येक ठिकाणी महिला सुरक्षित राहिली पाहिजे ही पोलिसांची जबाबदारी आहे. आयुक्तांची भेट घेतली, त्यांच्या भेटीसाठी येताना आणखीन एख केस आली, एका मुलीने नाही म्हणाली म्हणून तिला मारले आणि तिची प्रकृती गंभीर आहे. अशा केसेसमध्ये कुठलाही राजकीय पक्ष अडवणार नाही. आम्ही आमची नाराजी पोलिसांसमोर व्यक्त केली आहे. पोलिसांनी त्यांचा धाक, दहशत दाखवला पाहिजे. मंदिरात पुजारी जर असे करत असतील अशा लोकांवर पोलिसांची दहशत असली पाहिजे. शक्ती कायदा हा अजूनही बासनात गुंडाळून पडला आहे, माझी पंतप्रधानांना विनंती आहे की त्यांनी शक्ती कायदा पास करावा. असे गुन्हे घडले की त्यातील आरोपीला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे,”

याप्रकरणात काही लोक लव्ह जिहादचा आरोप करत असल्याबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या, “यांच्यात धर्म आणू नका. आपल्या हिंदू पुजाऱ्यानेही केलं आहे. दुसरी केस मंदिरात घडली असून अती लाजिरवाणी आहे. हे काम करणाऱ्या पुरुषांना धर्म नसतो. कोणत्याही धर्माचा, जातीचा असला तरीही तात्काळ शिक्षा झाली पाहिजे. लव्ह जिहाद केलं म्हणून मारायचं आणि पुजार्याने केल्यावर सोडायचं असं नाही. त्यालाही तितकीच कडक शिक्षा झाली पाहिजे,” असे त्या म्हणाल्या.

२५ जुलै रोजी उरण येथील २२ वर्षे यशश्री शिंदे ही बेपत्ता झाली होती. तिचा शोध सुरू असताना तिचा मृतदेह सापडला. यशश्री शिंदे बेलापूर मध्ये एका कंपनीत कामाला होती आणि उरणमध्ये तिच्या कुटुंबासह राहत होती. २५ जुलै रोजी ती सकाळी कामाला जाण्यासाठी निघाली मात्र, तेव्हापासून ती बेपत्ता होती तिचा फोन लागत नसल्याने कुटुंबियांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि यशश्री बेपत्ता असल्याची पोलिसांमध्ये तक्रार केली. यशश्रीचा शोध घेत असताना पोलिसांना रेल्वे स्थानकाजवळ झाडीत एक मृतदेह आढळला. यशश्रीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाब दाऊद शेख नावाच्या व्यक्तीवर हत्या केल्याचा आरोप करण्यात आला. आता, आरोपी दाऊद शेख याच्या अटकेनंतर त्याला फाशीशी शिक्षा करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

हे ही वाचा:

Virar मधील धक्कादायक बातमी, Shivsena UBT ठाण्याचे उपशहर प्रमुख Milind More यांचे निधन, हल्लेखोर पसार

Pune Zika Virus : पुण्यात Zika ची चिंता वाढली, दोघांचा मृत्यू तर रुग्णसंख्येत वाढ, काय काळजी घ्यायची?

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss