spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

रस्त्यात अचानक पेटती गाडी पाहत मुख्यमंत्र्यांनी थांबवला आपल्या गाडीचा ताफा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल औरंगाबद दौऱ्यावरुन मध्यरात्रीनंतर मुंबईत परतत असताना, त्यांना विलेपार्ले परिसरामध्ये महामार्गावरच एका तरुणाच्या गाडीला आग लागल्याचं दिसलं. यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा थांबवला आणि या तरुणाची विचारपूस केली. तसेच या तरुणाला मदतीचं आश्वासनही दिलं. या साऱ्या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आज अंगारक चतुर्थीच्या निमित्ताने जाणून घ्या शुभ मुहूर्त, विधी आणि पूजा करण्याची पद्धत

या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका तरुणाची विचारपूस करताना दिसत आहे. शिंदेंनी तरुणाला नाव विचारलं, त्यानंतर “घाबरू नको, जीव वाचला हे महत्त्वाचं आहे. गाडी आपण नवी घेऊ”, असं म्हणत त्यांनी त्याची समजूतही काढली. हे ऐकताच या तरुणाला रडू कोसळल्याचंही या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर शिंदेंनी पोलिसांशी चर्चा केली, त्याच्यासोबत कोण आहे का वगैरे चौकशी केली. त्यानंतर पुन्हा त्या तरुणाला “गाडीजवळ जाऊ नकोस बाळा”, असं सांगितलं. मुख्यमंत्र्यांचे हे शब्द ऐकून तरुणाला अश्रू अनावर झालेल्या तरुणाने मुख्यमंत्र्यांचे हात जोडून आभार मानले.

शिंदे गटाच्या समर्थक शीतल म्हात्रे यांनी आपल्या ट्वीटरवरुन हा व्हिडीओ शेअऱ केला आहे. त्यांनी यात म्हटले,”पश्चिम द्रुतगती महामार्गावर विलेपार्ले परिसरात एका तरुणाच्या गाडीला अचानक आग लागली. औरंगाबादहून मुंबईला येताना विमानतळावरुन घरी जाताना भर पावसात खाली उतरुन मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला या तरुणाला मदत करण्याचे आदेश दिलेत. हे आहेत आपले मुख्यमंत्री, असं ट्वीट शिंदे गटाच्या समर्थक नेत्या शीतल म्हात्रे यांनी केलं आहे.”

मुंबई-उपनगरात पाऊस सुरूच, लोकल सेवेवर परिणाम

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Time Maharashtra |Marathi news

Latest Posts

Don't Miss