spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

T20 series : Rinku आणि Surya यांच्या कामगिरीने केले Team India ला विजयी

सध्या चालू असलेल्या मेन्स क्रिकेट टी-२० मॅचचा काल (३० जुलै) तिसरा सामना रंगला. T20 इंटनॅशनल क्रिकेटमध्ये यापूर्वी कधीही गोलंदाजी न केलेल्या दोन गोलंदाजांनी शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये कमाल करत टीम इंडियाला अविश्वसनीय विजय मिळवून दिला. टीम इंडियानं श्रीलंकेविरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला आहे. या विजयासह भारतीय संघाने ही मालिका ३ – ०  या फरकानं जिंकली. तिसऱ्या सामन्यात बहुतेक काळ श्रीलंकेचं वर्चस्व होतं. लंकेला शेवटच्या दोन ओव्हरमध्ये विजयासाठी फक्त ९ रनची आवश्यकता होती. त्यावेळी T20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कधीही गोलंदाजी न करणाऱ्या दोन गोलंदाजांनी हा सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये भारतानं सहज विजय मिळवत, या सीरिजमध्ये निर्भेळ यश मिळवलं.

या सामन्यातील विजयला रिंकू आणि सूर्या यांची बॉलिंग विशेष महत्वाची ठरली. ज्यावेळी असं वाटत होत की आता श्रीलंकाच जिंकणार अश्या प्रसंगी रिंकूच्या कॅचने भारताला तारून नेले. असं म्हणण्यास वावगे ठरणार नाही. संघाचा कॅप्टन असणाऱ्या सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने रिंकू सिंहला (Rinku Sigh) १९ व्य ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्याची संधी दिली. त्याच सोबत त्याने या आधी टी-२० इंटरनॅशनल सामन्यातसुद्धा कधीच गोलंदाजी केली नव्हती. परंतु त्याला मिळालेल्या या संधीच त्याने सोन केलं. त्याने १९ व्या ओव्हरमध्ये अवघ्या ३ रन मध्ये चक्क २ विकेट घेतले.

श्रीलंकेला अवघ्या शेवटच्या ६ चेंडूंमध्ये ६ रन हवे होते. मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) यांची एक षटक शिल्लक असूनही संघ प्रमुख सूर्या याने स्वतः गोलंदाजीचे आव्हान पेलले. अगदी रिंकू प्रमाणेच सूर्या यांनीही कधी टी-२० इंटरनॅशनल मध्ये कधीच गोलंदाजी केली नव्हती. अशा महत्वपूर्ण आणि निर्णायक क्षणी उचलेले सूर्याचे हे पाऊल सामन्याला एका चांगले आणि कलाटणी देणारा मास्टरस्ट्रोक ठरले. सूर्यानेसुद्धा केवळ शेवटच्या षटकामध्ये  ५ रन देत २ विकेट्स घेतल्या. सूर्याने घेतलेला स्वतः साठीचा एक महत्वपूर्ण निर्णय हा योग्य ठरलेला दिसला. महत्वाची गोष्ट म्हणजे श्रीलंकेला बरोबरीने रोखत सामना सुपर हिट केला व श्रीलंकेला हार मानण्यास मजबूर केले.

हे ही वाचा:

दीप अमावस्येनंतर होणार श्रावणाला आरंभ, जाणून घ्या दीपपूजनाचे महत्व

Beetroot Paratha Recipe: पौष्टिक आणि चविष्ट बीटरूट पराठा नक्की ट्राय करा

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss