spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सदा सरवणकर यांची पिस्तूल जप्त

मुंबईतील प्रभादेवीत (Prabhadevi) शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटात झालेल्या राडा प्रकरणी सदा सरवणकर (MLA Sada Sarvankar) यांच्या अडचणी आता वाढ होण्याची शक्यता आहे.

मुंबईतील प्रभादेवीत (Prabhadevi) शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटात झालेल्या राडा प्रकरणी सदा सरवणकर (MLA Sada Sarvankar) यांच्या अडचणी आता वाढ होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचं पिस्तुल जप्त करण्यात आलं आहे. दादर पोलिसांनी सदा सरवणकरांचं पिस्तुल जप्त केलं आहे. तसेच, पोलिसांकडून त्यांना समन्सदेखील बजावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या राड्यावेळी सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. तसेच, याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात आली होती. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, घटनास्थळावरुन पोलिसांकडून गोळीही जप्त करण्यात आली होती.

गणेश विसर्जनासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शिवसेना आणि शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये मोठा राडा झाला होता. प्रभादेवी या ठिकाणी गणेश विसर्जनावेळी शिवसेना आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांना शांत राहण्याचे आदेश दिल्यानंतर संघर्ष टळला होता. परंतु शनिवारी हा वाद पुन्हा उफाळून आला. सदा सरवणकर समर्थकांकडून शिवसैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न केल्यानंतर शाब्दिक बाचाबाचीही झाली. यानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत (Mahesh Sawant) यांच्यासह शिवसैनिकांना पिस्तूलचा धाक दाखवून गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता. त्यानंतर सदा सरवणकर यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल झाला.

तसेच पोलिस ठाण्याच्या आवारात असलेले सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागल्यामुळे गोळीबार झाल्याची जवळजवळ खात्री पटली आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. या सबळ पुराव्यावरून दादर पोलिसांनी शिंदे गटातील आमदार सदा सरवणकरसह इतर १० ते १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यात आर्म्स कायदा (शस्त्र अधिनियम कायदा) कलम लावण्यात आले आहे.

दादर पोलिसांनी शनिवारी रात्री ठाकरे गटावर गुन्हा दाखल करून विभाग प्रमुख महेश सावंत यांच्यासह ५ जणांना अटक करून त्यांच्या विरुद्ध दंगलीसह जबरी चोरीचे कलम लावण्यात आले होते. मात्र तपासात जबरी चोरी झाली नसल्याचे समोर आले असून ३९५ हे कलम काढण्यात आले आहे. त्यांची वैयक्तिक जामिनावर पोलिस ठाण्यातून सुटका करण्यात येणार असल्याचे समजते.

हे ही वाचा:

शिंदे गटाचा दसरा मेळाव्या संबंधित आज महत्त्वाची बैठक, शिवाजी पार्क शिवाय इतर जागांची चाचपणी सुरु

रस्त्यात अचानक पेटती गाडी पाहत मुख्यमंत्र्यांनी थांबवला आपल्या गाडीचा ताफा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss