spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही मशीद वादा प्रकरणी न्यायालयात ११ याचिका प्रलंबित

मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही मशीद यांच्यातील वादावर आज मंगळवारी सुनावणी होणार आहे. हा वाद मथुरेतील १३.३७ एकर जमिनीचा आहे. यापैकी १०.९ एकर जमीन श्रीकृष्ण जन्मस्थानाजवळ आणि २.५ एकर इदगाह मशिदीजवळ आहे. याचिकाकर्ते मनीष यादव यांनी संपूर्ण जमीन देण्याची आणि शाही इदगाह मशीद हटवण्याची मागणी केली आहे. याचिकाकर्त्याने वादग्रस्त जागेचे व्हिडीओग्राफी आणि फोटोग्राफी करण्याचीही मागणी केली आहे. हे प्रकरण कनिष्ठ न्यायालयात प्रलंबित आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

हेही वाचा : 

दसरा मेळावा वादात अभिजित बिचुकलेंची उडी

किती याचिका प्रलंबित आहेत ?

आता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा न्यायालयाने येत्या चार महिन्यांत या याचिकेवर निर्णय द्यायचा आहे. श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही इदगाह मशीद प्रकरणी मथुरेच्या न्यायालयात आतापर्यंत ११ याचिका दाखल झाल्या आहेत. मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थान संकुलात मुघल शासक औरंगजेबाच्या काळात बांधलेली शाही ईदगाह मशीद तेथून हटवण्यात यावी, अशी, मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. श्रीकृष्ण विराजमान यांनी दाखल केलेल्या याचिकेत १३.३७ एकर जमिनीच्या मालकीची मागणी करण्यात आली आहे. श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संस्थान आणि शाही ईदगाह व्यवस्थापन समिती यांच्यातील १९६८ चा करार बेकायदेशीर असल्याचे कृष्ण भक्तांनी म्हटले आहे. हा करार रद्द करून मशीद हटवून संपूर्ण जमीन मंदिर ट्रस्टला द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. हा करार भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या भक्तांच्या इच्छेविरुद्ध असल्याचे म्हटले आहे.

मोदींचा फोटो न लावता निवडून दाखवा, अजित पवारांची भाजपवर शाब्दिक फेटकेबाजी

२५ सप्टेंबर २०२० रोजी दाखल केलेल्या याचिकेत अधिवक्ता विष्णू शंकर जैन यांनी म्हटले आहे की, श्री कृष्ण जन्मस्थान सेवा संस्थान आणि शाही ईदगाह व्यवस्थापन समिती यांच्यात १९६८ मध्ये झालेला करार चुकीचा आहे. तो रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. मंदिर परिसरात असलेली ईदगाह हटवून ती जागा मंदिर ट्रस्टला देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

रस्त्यात अचानक पेटती गाडी पाहत मुख्यमंत्र्यांनी थांबवला आपल्या गाडीचा ताफा

Latest Posts

Don't Miss