spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Wayanad Landslide : वायनाड भुस्खलनामधील मृतांच्या संख्येत मोठी वाढ; NDRF, DSG, MEG यांचे तपासकार्य अजून सुरूच

भूस्खलनानंतर वायनाडमध्ये ३०८ जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी शोध आणि बचावकार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अद्याप अनेक जण अडकल्याची शक्यता असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मंगळवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे मेपादी, मुंडक्की, चुरमाला आणि नुलपुल्ला या भागात दरड कोसळली. पहाटे २ आणि ४.३० वाजण्याच्या दरम्यान भूस्खल झाल्याने गावकऱ्यांना पाळण्याची संधीदेखील मिळाली नाही. एनडीआरएफ, नौदल आणि हवाई दल यांच्या मदतीनं बचावकार्य सुरु असून जोरदार पावसामुळे झालेल्या चिखलामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. अजूनही वायनाड मध्ये पावसाचा जोर ओसरलेला नसून रेड अलर्ट देण्यात आलं आहे. या दुःखद घटनेमुळे केरळ राज्य सरकारने दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केलं आहे.

केरळच्या वायनाडमध्ये (Wayanad landslide) भूस्खलनाला तीन दिवस उलटले आहे. मात्र आज चौथ्या दिवशीही ढिगाऱ्याखालून मृतदेह काढले जात आहे. या अपघातात आतापर्यंत ३०८ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र रेस्क्यूचं काम करणाऱ्या जमावाला आतापर्यंत १९५ मृतदेह सापडले आहेत. इतर लोकांच्या मृत्यूची पुष्ठी त्यांच्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवरून केली जात आहे. म्हणजे उरलेल्या १९५ लोकांच्या मृतदेहाचा कोणी एक भाग सापडला आहे. ज्यावरूनच मृतांचा आकडा निश्चित करण्यात आला आहे. लष्कर, हवाई आणि नेव्हीसह ४० बचावपथक रेस्क्यूचं काम करीत आहे. Rescue Operation अधिक चांगल्या पद्धतीने होण्यासाठी सर्चश्रेक्ष सहा विविध भागांमध्ये वाटण्यात आलं आहे. तिन्ही सैन्याव्यतिरिक्त NDRF, DSG, MEG ची संयुक्त टीम तपास अभियानात आहेत. या प्रत्येक टीमसह स्थानिकांचा, एक वन विभाग कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.

भूस्खलनानंतर वायनाडमध्ये ३०८ जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी शोध आणि बचावकार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अद्याप अनेक जण अडकल्याची शक्यता असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसानंतर केरळमध्ये चारुलमाला गाव (Charmal Village karnataka) ढिगाऱ्याखाली गाडलं गेलंय. चारुलमाला गावात अनेक जण झोपेत असतानाच डोंगरातून आलेल्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहे. घटनास्थळी सकाळपासून एनडीआरआफ,  लष्कर, वायूसेनेची पथकं बचावकार्यात प्रयत्नांची शर्थ करताय. दरम्यान आज घटनास्थळी राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधींनी (Priyanka Gandhi) पीडित कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं.

हे ही वाचा:

Nitin Desai एक संघर्षमय कहाणी..

कोकणकरांसाठी आता रेल्वेमहामंडळानंतर लालपरीच्या फेऱ्यासुद्धा वाढवणार

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss