spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवला, तुम्हाला जमेल का? संजय राऊतांचा शिंदेंना सवाल

एकीकडे ठाकरे सरकार कोसळत असताना भाजपकडून सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना सवाल केला आहे.

महाराष्ट्रातील राजकारणात सत्तापालटाचा खेळ सुरु झाला आहे. काल उशिरा फेसबुक लाईव्ह द्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देत असल्याची घोषणा केली. यावेळी विधान परिषद सदस्यत्वाचा देखील त्याग केल्याचं ही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी बुधवारी उशीरा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांचा राजीनामा स्वीकारला असून त्यांना पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पदाचा कार्यभार सांभाळण्यास सांगितले आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणाला वेगळं वळण लागलं आहे. एकीकडे ठाकरे सरकार कोसळत असताना भाजपकडून सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना सवाल केला आहे.

संजय राऊत प्रसार माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया देत म्हणाले, ”माझ्यावर आणि पवारांवर आरोप नको, उत्तम खाती दिल्यानंतर ही आमच्याच लोकांनी आम्हाला दगा दिला. बाळासाहेबांना उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवणार हे वचन दिलं होतं. मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन, मी त्यासाठी प्रयत्न केले. तुम्ही तसे करणार आहात का ? तुमचा नेता मुख्यमंत्री होणार आहे का ? स्वाभिमानाची भाकरी सोडून तुम्हाला चाकरी करावी लागणार. धुनी भांडी च करावी लागणार आहे तुम्हाला” असा सवाल त्यांनी शिंदे यांना केला. त्याचबरोबर शिवसेनेचं मीठ खात आहे त्यामुळे पळू जाणाऱ्यातली आमची औलाद नाही. उद्या दुपारनंतर मी ईडीसमोर हजर होणार असून माझी भूमिका स्पष्ट करेन. असं संजय राऊत म्हणाले.

कालच्या फेसबूक लाईव्ह द्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात कोणत्याही शिवसैनिकांनी गोंधळ घालू नये असे आवाहन केले आहे. नव्या लोकशाहीचा पाळणा हलणार असून कोणत्याही शिवसैनिकाने नव्या सरकारच्या मधे येऊ नये, त्यांना त्यांच्या विजयाचा गुलाल उधळू द्या असे म्हटले आहे. दुसरीकडे भाजप नेत्यांची आज बैठक होणार आहे. गोव्यात शिंदे गटातील बैठकीनंतर एकनाथ शिंदे मुंबई ला रवाना होणार असल्याची माहिती समोर येते आहे. भाजप आज राज्यपालांकडे सत्ता स्थापना करण्याचा दावा करणार आहे.

Latest Posts

Don't Miss