अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत नाव कमावणारा एक कलाकार म्हणजे हेमंत ढोमे. हेमंत याआधी बऱ्याच चांगल्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या समोर आला आहे. आज हेमंतसोबत एक धक्कदायक प्रसंग घडला असून त्याबद्दलची माहिती त्याने त्याच्या सोशल मीडियावरून शेअर केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाल्याच्या घटना सतत समोर येत आहेत. यामध्येच आता अभिनेता हेमंत ढोम याचं फेसबुक पेज हॅक झालं आहे. याबाबत त्याने तक्रार दाखल केली आहे.
हेमंतने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याविषयीची माहिती चाहत्यांना दिली आहे. अभिनेता हेमंत ढोमे यांचं फेसबुक पेज हॅक झालं असून त्याच्या नावात बदल केल्याचं दिसून येत आहे. अनेक कलाकारांचं अकाऊंट हॅक होण्याचे प्रकार घडले आहेत. नुकताच या स्कॅमचा बळी मन उडू उडू झालं फेम अभिनेता अजिंक्य राऊत सुद्धा ठरला. अजिंक्यचं इन्स्टाग्राम अकाऊंट काही कारणाने हॅक झालं होतं. असाच काहीस प्रकार हेमंत ढोमेच्या बाबतीत सुद्धा घडला आहे. वाढत्या सायबर गुन्हांच्या पार्श्वभूमीवर हेमंतने त्वरित आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांना आणि प्रेक्षकांना ही माहिती दिली.
तसंच या पेजवर शेअर करण्यात आलेली कोणतीही पोस्ट अधिकृत समजू नका, अस आवाहनही केलं.”माझे Facebook अकाऊंट हॅक झाले आहे…संबंधित पेजवर पोस्ट होणारी कोणतीही पोस्ट तूर्तास अधिकृत समजू नये. पेज रिकव्हरी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत…. लवकरात लवकर पेज पूर्ववत होईल अशी आशा…धन्यवाद!”, असं म्हणत हेमंतने इन्स्टावर पोस्ट शेअर केली आहे.