spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सेमीकंन्डक्टरच्या बाबतीत भारत स्वावलंबी होणार; वेदांत १.५४ लाख कोटी रुपयांचा प्रकल्प उभारणार

गुजरात सरकार युनिट स्थापन करण्यासाठी वेदांतला ४०० एकर जमीन मोफत देणार आहे.

सेमीकंडक्टर टंचाईवर मात करण्यासाठी आणि भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी कोरोना महामारीनंतर सुरू करण्यात आलेली सरकारची उत्पादन आधारित प्रोत्साहन (पीएलआय) योजना आता रंग दाखवत आहे. टाटानंतर वेदांतनेही चिप्स बनवण्यासाठी प्लांट उभारण्याबाबत बोलले जात आहे. यामध्ये तैवानची कंपनी फॉक्सकॉन देखील तांत्रिक भागीदार असेल.

मंगळवारी गुजरात सरकार, फॉक्सकॉन आणि वेदांत यांच्यात हा प्रकल्प उभारण्यासाठी करार करण्यात आला. याअंतर्गत कंपनी गुजरातमध्ये १.५४ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह प्लांट उभारणार आहे. या प्लांटमध्ये सेमीकंडक्टरसोबत डिस्प्ले फॅबही तयार करण्यात येणार आहे. कंपन्या आणि सरकार यांच्यातील सामंजस्य करार (एमओयू) अंतर्गत, वेदांत डिस्प्ले लिमिटेड गुजरातमध्ये ९४,५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह एक डिस्प्ले फॅब युनिट स्थापन करेल, तर वेदांत सेमीकंडक्टर लिमिटेड ६० हजार कोटी रुपयांमध्ये एक उत्पादन युनिट आणि गुंतवणुकीसह OSAT स्थापन करेल. ज्यामध्ये फॉक्सकॉन तांत्रिक भागीदार असेल.


वेदांतानुसार २०२४ मध्ये काम सुरू होईल.

या उत्पादन युनिटमध्ये ३०० मिमी वेफर आकाराचे २८ नॅनोमीटर तंत्रज्ञान नोड्स असतील, जे आठव्या पिढीतील डिस्प्ले तयार करतील. घड्याळे, मोबाईल, टीव्ही यांसारख्या लहान उपकरणांसह मोठा एलईडी बनवण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. गुजरातची राजधानी अहमदाबाद येथे सुमारे ४०० एकर जागेत हे युनिट उभारले जाणार आहे. कंपनीने सांगितले आहे की हे युनिट २०२४ मध्ये उत्पादन सुरू करेल.

वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल म्हणाले की, भारतामध्ये सिलिकॉन व्हॅली अमेरिकेच्या १०० मैलांपेक्षा मोठी करण्याची क्षमता आहे, असे वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी सांगितले . आम्हाला यूपी, बिहार, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश येथूनही अनेक ऑफर मिळत आहेत. भारत सरकारने देशात OSAT/ATMP युनिट्स स्थापन करण्यासाठी ७६ हजार कोटी रुपयांच्या प्रोत्साहनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. या अंतर्गत, युनिट स्थापन करणारी कंपनी जितके जास्त उत्पादन करेल, तितके अधिक प्रोत्साहन दरवर्षी दिले जाईल.

गुजरात सरकार देणार मोफत जमीन

याआधी वृत्तसंस्था रॉयटर्सने सांगितले होते की, गुजरात सरकार युनिट स्थापन करण्यासाठी वेदांतला ४०० एकर जमीन मोफत देणार आहे. याशिवाय परवडणारी वीज आणि आर्थिक व बिगर आर्थिक सबसिडीही मिळणार आहे. कंपनीने राज्यात युनिट्स उभारण्यासाठी १००० एकर जमीन ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर, वीज आणि पाणी २० वर्षांसाठी ठराविक किमतीत देण्याची मागणी केली होती, जी राज्य सरकारने मान्य केली आहे

हे ही वाचा:

कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करा – अजित पवार

फ्रेंच न्यू वेव्ह चित्रपट निर्माते जीन लुक गोडार्ड यांनी वयाच्या ९१व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss