spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख कायमच आपल्या अभिनयनाने आणि विनोदाच्या उत्तम टायमिंगमुळे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आला आहे.

मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख कायमच आपल्या अभिनयनाने आणि विनोदाच्या उत्तम टायमिंगमुळे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आला आहे. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. त्यानंतर ‘मस्ती’, ‘धमाल’, ‘एक व्हिलनसारखे’ चित्रपट त्याने केले आहेत. ‘लई भारी’ चित्रपटातून त्याने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. नुकताच त्याच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

‘प्लॅन ए प्लॅन बी’ (Plan A Plan B) या चित्रपटांमार्फत अभिनेता रितेश देशमुख आपल्या सर्वांच्या भेटीस येणार आहेत. तसेच या चित्रपटांमध्ये रितेश सोबत अभिनेत्री ‘तमन्ना भाटिया’ देखील असणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तमन्ना ही लोकांची लग्न जुळवणारी दाखवली आहे तर रितेश लग्न मोडणारा दाखवला आहे. चित्रपटात रितेश वकिलाच्या भूमिकेत आहे तर तमन्ना मॅच मेकर दाखवली आहे. हे दोघे एकमेकांच्या पडतात हे चित्रपटात दाखवले आहे. हा चित्रपट पूर्णपणे मसाला चित्रपट असणार हे नक्कीच झाले आहे. यात तुम्हाला प्रेमकहाणी, भांडण, नाट्यमयता असणार आहे. ट्रेलरला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच आपल्याला ही जोडी बघायला मिळणार आहे.

तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शक शशांक घोष हे आहेत. आणि नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर हा प्रदर्शित झाला असून या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळत आहे. यात रितेश आणि तमन्ना व्यतिरिक्त पूनम ढिल्लन आणि कुशा कपिला यांच्याही भूमिका आहेत. याची निर्मिती रजत अरोरा (फंक युवर ब्लूज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड) आणि त्रिलोक मल्होत्रा आणि के आर हरीश (इंडिया स्टोरीज मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड) यांनी केली आहे.

हे ही वाचा :

सेमीकंन्डक्टरच्या बाबतीत भारत स्वावलंबी होणार; वेदांत १.५४ लाख कोटी रुपयांचा प्रकल्प उभारणार

कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करा – अजित पवार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss