spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके, एकनाथ शिंदेंवर आदित्य ठाकरेंनी केली घणाघाती टीका

हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं. यांचं जीत के हारने वाले को खोके सरकार कहते हैं

महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये नेले जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जातोय. आज आदित्य ठाकरे एका पत्रकार परिषदेत बोलत होते. तेव्हा ते म्हणाले, ”वेदांता व फॉक्सकॉनने आपला प्रकल्प महाराष्ट्रात उभारा असण्याचे जाहीर केले होते. याबाबत आम्ही वेदांताचे अनिल अग्रवाल यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळीही त्यांनी महाराष्ट्रात येणार असल्याचे सांगितले होते. त्यांच्या टीमने तळेगावची निवड देखील केली होती. मात्र आता हा प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचे कळल्यानंतर मला धक्का बसला आहे.”

आदित्य ठाकरे म्हणाले की, अनिल अग्रवाल यांचे ट्वीट पाहून धक्का बसला. कारण आम्ही दोघेही (सुभाष देसाई ) या कंपनीसोबत चर्चा करत होतो. याबाबतच आमची २१ जानेवारी २०२२ रोजीही यावरून चर्चा झाली. त्यावेळी हा प्रकल्प महाराष्ट्रात होणार होता. तसेच महत्वाचं म्हणजे हा उद्योग पावणेदोन लाख कोटी रुपयांचा आहे. यात १६० लहान उद्योग देखील सोबत येणार होते. यामुळे ७० हजार ते १ लाख रोजगार निर्मिती होणार होती. हे सर्व होत असताना, आता हा उद्योग गुजरातला जात असल्याची बातमी आमच्या कानावर आली.

तसेच त्यांनी ९५ टक्के सर्व व्यवस्थित पार पडले होते. १०० टक्के सायनिंगनंतर ठरणार होतं. सर्व ठरल्यानंतर ही कंपनी महाराष्ट्रातून बाहेर का गेली. असा सवालही त्यांनीं केला. तसेच अग्रवाल यांच्या ट्विटचा संदर्भ देऊन बोलत असताना “आपले उद्योग मंत्री आपलं सरकार, जे खोके सरकार आहे. मी या सरकारला सरकार मनात नाही. कारण हे घटनाबाह्य सरकार आहे. या सरकारमध्येही ही जी काय व्यवस्था आहे. ते काय करत होते”, असा घणाघात देखील त्यांनी केलाय.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, ”एकंदरीत आता परिस्थिती पाहता, महाराष्ट्रात सरकार आहे की नाही? हा मोठा प्रश्न पडला आहे. मग यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असो की, कोण कुठे गोळीबार करत असतो हा, या सर्व गोष्टी पाहता किती गुंतवणूकदार आपल्या राज्यात येणार.” यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केली आहे. ते म्हणाले आहेत की, स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके. बाजीगर चित्रपटात होतं की, हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं. यांचं जीत के हारने वाले को खोके सरकार कहते हैं, असं ते झाले आहेत.

हे ही वाचा:

सेमीकंन्डक्टरच्या बाबतीत भारत स्वावलंबी होणार; वेदांत १.५४ लाख कोटी रुपयांचा प्रकल्प उभारणार

कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करा – अजित पवार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss