spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

लम्पिच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबई महानगरपालिका अलर्टवर

लम्पीच्या प्रसारात तब्बल १८५ जनावरांना लागण झाली. यामध्ये 29 जनावरांचा लम्पीने मृत्यू झाला.

महाराष्ट्रात दिवसेंदिवस लम्पी आजाराचा (Lumpy Skin Disease ) प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे गायी, बैल, बकऱ्या आणि म्हशी अशा विविध प्राण्यांना या आजाराची लागण होत आहे. म्हणूनच आता या रोगाचा वाढता धोका लक्षात घेऊन मुंबईभरातील सर्वच गोशाळा, तबेले, गोठ्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जनावरांमध्ये लक्षणांची तपासणी करण्यात येणार असून अस्वच्छता आढळल्यास संबंधितांना नोटीस बजावण्यात येणार आहे.  यामध्ये आवश्यक त्या ठिकाणी कीटकनाशक फवारणी केली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. तसेच पशुपालकांनी स्वच्छतेबाबत विशेष खबरदारी घ्यावी असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जळगाव जिह्यातील रावेर तालुक्यात ऑगस्टमध्ये जनावरांना लम्पीची लागण झाल्याचे सर्वप्रथम समोर आले. लम्पीच्या प्रसारात तब्बल १८५ जनावरांना लागण झाली. यामध्ये 29 जनावरांचा लम्पीने मृत्यू झाला.त्यामुळे मुंबई महापालिकेनंही आवश्यक खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये लम्पी रोगाचा प्रदुर्भाव झाला आहे. यामध्ये राज्यातील अहमदनगर, जळगाव, अकोला, धुळे, पुणे, औरंगाबाद, लातूर आणि बीड या जिल्ह्यातील जनावरांमध्ये सध्या लम्पी स्किन आजाराचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.

लम्पी आजाराची लक्षणे

  • लम्पी आजार गोवंशीय प्राण्यांमध्ये होणारा संसर्गजन्य आजार आहे.
  • या आजाराला कॅपरी पॉक्सही म्हटले जाते.
  • या आजारात डास, माश्या, गोचीड आदींच्या माध्यमातून आजाराचा प्रसार होतो.
  • दूषित अन्नपाण्याच्या सेवनानेही आजाराचा प्रसार होतो.
  • या विषाणूची लागण झालेल्या जनावरांच्या त्वचेवर गुठळ्या तयार होऊन फोड येतात.
  • यानंतर गुरांना ताप येणे, नाक वाहणे, जास्त लाळ गळणे, डोळे येणे अशी लक्षणे दिसतात.
  • सध्या या आजारावर कोणताही उपचार नसून प्रतिबंधासाठी ‘गोटपॉक्स’ लस वापरली जात आहे.

हे ही वाचा:

स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके, एकनाथ शिंदेंवर आदित्य ठाकरेंनी केली घणाघाती टीका

सेमीकंन्डक्टरच्या बाबतीत भारत स्वावलंबी होणार; वेदांत १.५४ लाख कोटी रुपयांचा प्रकल्प उभारणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss