spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प हातातून निसटला कसा? राज ठाकरेंचा सवाल

. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?

सेमीकंडक्टर टंचाईवर मात करण्यासाठी आणि भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी कोरोना महामारीनंतर आता टाटाच्या बरोबरीने वेदांत कंपनीदेखील चिप्स बनवण्यासाठी प्लांट उभारणार असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये तैवानची कंपनी फॉक्सकॉन देखील तांत्रिक भागीदार असेल. मात्र महाराष्ट्रात होणारा हा प्रकल्प आता गुजरातमध्ये घेऊन गेल्याचा आरोप महाराष्ट्रातील अनेक राजकारणी करत आहेत. आदित्य ठाकरेंनंतर आता राज ठाकरेंनीदेखील या नव्या वादात उडी घेतली आहे.

राज ठाकरेंनी नुकतीच याबाबत फेसबुकवर एक पोस्ट केली आहे आणि त्या पोस्टमध्ये ते म्हणाले आहेत, फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा? हा प्रकार गंभीर आहे. म्हणूनच ह्या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं. अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या विषयाकडे बघायला हवं. असे राज ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंट वर पोस्ट शेअर केली आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे ?

याबद्दल एक पत्रकार परिषदेत बोलत असताना आदित्य ठाकरे म्हणाले, ”वेदांता व फॉक्सकॉनने आपला प्रकल्प महाराष्ट्रात उभारा असण्याचे जाहीर केले होते. याबाबत आम्ही वेदांताचे अनिल अग्रवाल यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळीही त्यांनी महाराष्ट्रात येणार असल्याचे सांगितले होते. त्यांच्या टीमने तळेगावची निवड देखील केली होती. मात्र आता हा प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचे कळल्यानंतर मला धक्का बसला आहे.” तसेच त्यांनी ९५ टक्के सर्व व्यवस्थित पार पडले होते. १०० टक्के सायनिंगनंतर ठरणार होतं. सर्व ठरल्यानंतर ही कंपनी महाराष्ट्रातून बाहेर का गेली. असा सवालही त्यांनीं केला.

काय असणार आहे प्रकल्प ?

मंगळवारी गुजरात सरकार, फॉक्सकॉन आणि वेदांत यांच्यात हा प्रकल्प उभारण्यासाठी करार करण्यात आला. याअंतर्गत कंपनी गुजरातमध्ये १.५४ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह प्लांट उभारणार आहे. या प्लांटमध्ये सेमीकंडक्टरसोबत डिस्प्ले फॅबही तयार करण्यात येणार आहे. कंपन्या आणि सरकार यांच्यातील सामंजस्य करार (एमओयू) अंतर्गत, वेदांत डिस्प्ले लिमिटेड गुजरातमध्ये ९४,५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह एक डिस्प्ले फॅब युनिट स्थापन करेल, तर वेदांत सेमीकंडक्टर लिमिटेड ६० हजार कोटी रुपयांमध्ये एक उत्पादन युनिट आणि गुंतवणुकीसह OSAT स्थापन करेल. ज्यामध्ये फॉक्सकॉन तांत्रिक भागीदार असेल असे सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा:

गगनयान पहिल्या उड्डाणासाठी सज्ज, २०२४ मध्ये गगनयान मोहीम सुरू होण्याची शक्यता

स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके, एकनाथ शिंदेंवर आदित्य ठाकरेंनी केली घणाघाती टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss