spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Modi Government चा डोळा Waqf Board च्या जमिनींवर, Jitendra Awhad यांची जोरदार टीका

केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी (८ ऑगस्ट) लोकसभेत वक्फ बोर्डाविषयी कायद्यात सुधारणा करण्यासाठी एक विधेयक सादर केले. हे विधेयक सादर केल्यानंतर संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव दिला. मात्र, विरोधकांनी या विधेयकाला कडाडून विरोध केला आहे. हे विधेयक म्हणजे संविधान, संघराज्य आणि अल्पसंख्यांकांवर हल्ला असल्याचे म्हंटले आहे. विरोधकांकडून कडाक्याचा विरोध होत असताना किरेन रिजिजू यांनी हे विधेयक कोणत्याही धार्मिक स्वातंत्र्यात हस्तक्षेप करत नाही. यातून घटनेच्या कोणत्याही कलमाचे उल्लंघन झालेले नसल्याचे म्हंटले आहे. आता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यावरून सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारचा डोळा वक्फ बोर्डाच्या जमिनींवर असल्याचा टोला त्यांनी यावेळी मारला.

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाउंटवरून केंद्र सरकारच्या या विधेयकावर जोरदार हल्लाबोल केला. वक्फ बोर्डाच्या मालकीच्या देशभरात सध्या ९.४ लाख एकर जमिनीवर वक्फच्या मालमत्ता आहेत. त्यामुळे या जागा सरकारला कुणाच्या घशात घालायच्या आहेत, हे वेगळं सांगायला नकोय, असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. तसेच राम मंदिर निर्माणासाठी अयोध्येत माहिती अधिकाराअंतर्गत तब्बल १३ हजार एकर जमिनीचा घोटाळा उघडकीस आला होता, असा आरोपदेखील त्यांनी केला आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

जितेंद्र आव्हाड आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केली. ते म्हणाले –

प्रभू श्रीरामाच्या नावाने आधी अयोध्येमधील जमिनीवर डल्ला मारण्यात आला. २०१७ पासून जमिनीचे सरकारी दर वाढविण्यात आले नाहीत, त्यामुळे सत्ताधा-यांशी संबंधितांनी अतिश स्वस्तात तेथील जमिनीची खरेदी केली. लष्कराच्या नावे असलेली जमिनसुद्धा हडपण्याचा प्रकार उघडकीस आला होता, परंतु कोर्टाने वेळीच हस्तक्षेप केल्याने त्याला चाप बसला. अयोध्येत माहिती अधिकाराअंतर्गत तब्बल १३ हजार एकर जमिनीचा घोटाळा उघडकीस आला होता. अयोध्येतील जमीन उद्योगपती आणि अध्यात्मिक बाबा-गुरूंना विकल्याचे समोर आले आहे.

याच पार्श्वभूमीवर आता मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारचा डोळा वक्फ बोर्डाच्या जमिनींवर आहे. केंद्र सरकारकडून वक्फ कायद्यात जे बदल प्रस्तावित आहेत, त्यामागे ‘दानधर्म’ या संकल्पनेचं महत्त्व कमी होत असल्यामुळे नाही तर अतिक्रमण केलेल्यांना मालमत्तेचा मालक बनवण्यासाठी हे बदल केले जातायत.

वक्फ बोर्डाकडे अत्यंत मोक्याच्या ठिकाणच्या जागा आहेत, त्यामुळे अनेकांना या बदलांमध्ये स्वारस्य आहे. देशभरात सध्या 9.4 लाख एकर जमिनीवर वक्फच्या मालमत्ता आहेत. त्यामुळे या जागा सरकारला कुणाच्या घशात घालायच्या आहेत, हे वेगळं सांगायला नकोय.ह्या नंतर नंबर ख्रिस्ती समाज व महार वतन जमिनी

हे ही वाचा :

Vidhansabha Election 2024 : ‘या’ ७ विभागात होणार जाहीर सभा; मुख्यमंत्र्यांसह ३ नेत्यांनी घेतला मध्यरात्री निर्णय

Paris Olympics 2024 : भारताच्या खात्यात ‘रौप्य’ पदकाचा मान; Niraj Chopara याने तोडला आपलाच ऑलम्पिक रेकॉर्ड ठरला इतिहाससच मानकरी

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss