spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Raj Thackeray काय नेता आहे का ? ते सगळे सुपारीबाज: Sanjay Raut

शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल (शनिवार, १० ऑगस्ट) ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात सभा पार पडली. या सभेपूर्वी ठाण्यात मनसे कार्यकर्ते आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचा ताफा येताच गाडीवर शेण, बांगड्या आणि नारळ फेकले. दोन्ही बाजूला कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आले. यानंतर मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. ठाण्यात सकाळपासून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी नंतर मनसे कार्यकर्त्यांची धरपकड केली. यानंतर राज ठाकरे यांनी मनसेच्या महिला कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉल करत त्यांचे अभिमानदं केले. यावर शिवसेना उबाठा पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून, “कसले अभिनंदन करता? काय मोठ्या मर्दानगी गाजवली?” असा सवाल उपस्थित करत राज ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, “राज ठाकरे काय नेता आहे का ? ते सगळे सुपारीबाज आहेत. अहमदशहा अब्दालीकडून सुपारी घेतलेले सर्व सुपारी बाज लोकं आहेत, कसले अभिनंदन करता? काय मोठ्या मर्दानगी गाजवली लोकांनी? मराठी माणूस एकमेकांविरुद्ध लढतो आणि अहमदशहा अब्दाली तिकडे टाळ्या वाजवत आहे. तुम्ही कुठे आहात, आम्ही सुपाऱ्या तर घेत नाहीत ना कोणाच्या, आम्ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक आहोत हे त्यांनाही माहिती आहे आणि ते सुद्धा मान्य करतात आणि निष्ठेने राहणं एका पक्षाबरोबर हे काही लोकांच्या पोटात दुखत असेल पण तो त्यांचा प्रश्न आहे. शरद पवार हे देशातले एक जेष्ठ नेते आहेत अनुभवी नेते आहेत कृषी सामाजिक क्षेत्रातले सर्वात मोठे जाणकार आणि मार्गदर्शक आहेत तुम्ही त्यांच्याविषयी तुमच्या मनात जे भावना असतील, एकेकाळी तुम्ही त्यांचे उंबरठे झिजवत होतात ते विसरलात, त्यांच्या उंबरठ्यावर जाऊन बसत होता हे महाराष्ट्राने पाहिला आहे, फार बोलायला लावू नका,” असे ते म्हणाले.

नेमकं घडलं काय?

शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहात सभा पार पडली. बीडमध्ये राज ठाकरे यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांनि सुपारी फेकत केलेल्या आंदोलनावर रिअक्शन म्हणून मनसेने उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर शेण, बांगड्या, फेकण्यात आल्या. यामुळे ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झले . पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धरपकड केली. यानंतर राज ठाकरे यांनी स्वतः पोलिसांनाही ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना व्हिडीओ कॉल लावून त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांचे अभिनंदन केले. यावरून आता राज्यभारत याचे पडसाद उमटताना दिसत असून विविध पक्षांतील नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

“ठाण्यातील लोकांना औषध द्यायला जमतय, त्यांनी बरोबर जमलगोटा दिलाय..” – Eknath Shinde यांचे सडकून टीकास्त्र

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss