spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Mahayuti Government ५० टक्के कमिशनखोरी करुन मलई खात आहे, Ramesh Chennithala यांचे गंभीर आरोप

विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या बैठका सुरु असून आज (रविवार, ११ ऑगस्ट) नांदेडमध्ये नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आला. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala)  यांनी महायुती सरकारवर (Mahayuti Government) जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी बोलताना त्यांनी, “महायुती सरकार जनतेच्या विकासाची कामे करत नाही तर ५० टक्के कमिशनखोरी करुन मलई खात आहे,” असे वक्तव्य केले आहे.

यावेळी रमेश चेन्निथला म्हणाले, “महायुती सरकार जनतेच्या विकासाची कामे करत नाही तर ५० टक्के कमिशनखोरी करुन मलई खात आहे. महायुती सरकार हे लोकशाही मार्गाने, जनतेने निवडून दिलेले सरकार नाही तर तोडफोड करून आयाराम, गयारामचे सरकार आहे, या असंवैधानिक सरकारवर जनतेचा विश्वास नाही. लोकसभा निवडणुकीत जसे या भाजपाला नाकारले तसेच विधानसभा निवडणुकीतही भ्रष्ट युती सरकारला हटवा व मविआचे सरकार आणा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, “महायुती सरकारकडे जनतेच्या योजनांसाठी पैसे नाहीत. निवडणुकीच्या तोंडावर काही योजना जाहीर केल्या आहेत त्यासाठी इतर योजनांचा पैसा वापरला जात आहे. विधान सभा निवडणुकीला काँग्रेस मविआ एकत्र सामोरे जाणार आहेत. जागा वाटपाची चर्चाही सुरु आहे. एक सक्षम जनतेचे सरकार देण्याचा मविआचा प्रयत्न आहे. शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गाडीच्या ताफ्यावर ठाण्यात शेण व नारळ फेकण्यात आले, त्याचा काँग्रेस पक्ष निषेध करत आहे, राजकारणात असे प्रकार होऊ नयेत,” असे रमेश चेन्नीथला म्हणाले.

विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या बैठका सुरु असून आज नांदेडमध्ये नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आला. यावेळी प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद गटनेते सतेज बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, यांच्यासह इतर काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

आधी ठाण्यात मनसे आणि आता कोल्हापूरात शिवसैनिक यांचा आक्रमक पावित्रा; जाणूयात सविस्तर

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss