spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कोकणातील चाकरमान्यांचा बोरीवली ते कोकण प्रवास होणार सुखकर; रेल्वे मंत्र्यांची नवी घोषणा

गणेशोत्सव म्हंटल की गावी जाण्याची ओढ काही केल्या थांबू शकत नाही. त्यातही जर कोकणातले गणपती म्हंटल तर लालमातीत कोरलेली शाडूची गणपती बाप्पाची मूर्ती समोर येते. कोकणातील सर्वात जास्त प्रसिद्ध सणांपैकी एक म्हणजे हा गणेशोत्सव सण होय. कोकणातील चाकरमानी हे सुट्टी असो वा नसो गणपतीला कोकणात गेले नाहीत असं होत नाही. या उत्सवाची सर्व प्रकर्षाने वाट पाहत असतात. कितीतरी महिन्यांआधी पासूनच चाकरमानी कोकणात जाण्यासाठी सीट्स बुक करत असतात. त्यातच आता एक नवी खुश खबर आली आहे. कोकणात (Konkan) जाण्यासाठी प्रवाशांची रेल्वे आरक्षण तिकीट बुकिंग करण्यासाठी एकच झुंबड उडते. चाकरमान्यांची मोठी गर्दी पाहता मध्य रेल्वेकडून (Central Railway) दरवर्षी गणेशोत्सवामध्ये विशेष रेल्वेगाड्या सोडल्या जातात. या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून आणखी एक आनंदाची बातमी मिळत आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी बोरीवलीहून थेट कोकणात जाण्याकरता नवी रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई येथील उपनगरात राहणार्‍या चाकरमान्यांची मोठी सोय होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर मुंबईतील माणूस आपल्या गावाकडे म्हणजेच कोकणात जात असताना दादर, सीएसएमटी असे फिरुन जावे लागत होते. त्यामुळे कित्येक वर्षांपासून बोरीवलीमधून कोकणाला जाण्यासाठी रेल्वे असावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. नागरिकांची अडचण लक्षात घेता केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बोरीवलीवरून थेट कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडीकडे जाण्याकरता पुढील आठवड्यापासून नव्याने रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती बोरिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील राणे यांनी दिली आहे. दरम्यान, बोरीवलीच नव्हे तर गोरेगाव अगदी वसईमधून जाणाऱ्यांना ही नवीन गाडी उपयुक्त ठरणार आहे. ही रेल्वे २३ ऑगस्टपासून सुरु होणार असून याबबात पहिला कार्यक्रम बोरिवलीमधून कोकणाकडे जाणाऱ्या गाडीचा २४ ऑगस्टला सकाळच्या वेळेत होणार आहे. एकंदरीतच कोकणात जाणाऱ्या चाकरमन्यांच्या दृष्टीने ही आनंदाची बाब आहे.

Latest Posts

Don't Miss