spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Kolkata Rape Murder Case : Kolkata हत्याकांडाच्या निषेधार्थ देशभरात डॉक्टरांचा संप; IMA कडून मागण्यांची यादी जाहीर

कोलकात्यात झालेल्या प्रकरणाबाबत देशात संतापाची लाट उसळताना दिसत आहे. प्रत्येक क्षेत्रातून झालेल्या कृत्याचा निषेद नोनंदवला  जात आहे.  कोलकातामध्ये महिला डॉक्टरची अत्याचारानंतर (Kolkata News) हत्या करण्यात आल्याने देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने आज देशभरातील सर्व सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये आज संप (Doctor Strike) पुकारला आहे. या प्रकरणी आधीही दोन दिवस संप केला होता. मात्र त्यानंतर सरकारशी झालेल्या चर्चेनंतर संप मिटवण्यात आला. सोबतच त्यांनी आपल्या काही मागण्या मांडल्या आहेत त्याही या माध्यमातून जाणून घेऊ.

दरम्यान, दिल्ली एम्समध्ये डॉक्टरांनी कँडल मार्च काढला त्यामध्ये डॉक्टरांनी कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरला न्याय देण्याची मागणी केली आहे. आयएमएने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, १७ ऑगस्टपासून (शनिवार) २५ तासांसाठी हा बंद (Doctor strike) असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोलकातामधील अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने आज सकाळी ६ ते रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत संपावर असणार आहेत. या काळात रुग्णांची ओपीडी आणि ऑपरेशन्स होणार नाहीत. मात्र, आपत्कालीन सेवा सुरू राहतील. २४ तासांच्या या संपामुळे देशातील वैद्यकीय सेवेवर याचा मोठा परिणाम दिसून येणार आहे.

कोणकोणत्या सेवा बंद असणार आहेत?

डॉक्टरांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे, असे मत व्यक्त करत मृत महिला डॉक्टरला न्याय, डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय कायदा आदी मागण्या घेऊन हे आंदोलन केले जाणार आहे. देशभरातील डॉक्टरांनी संप पुकारल्याने आरोग्यव्यवस्था कोलमडली आहे. या संपकाळात बाह्य रुग्ण सेवा (ओपीडी) तसेच नियोजित शस्त्रक्रिया बंद राहणार आहे. तर अत्यावश्यक वैद्यकीय सेवा आणि अत्यावश्यक शस्त्रक्रिया सुरू राहणार आहेत.

IMA च्या नक्की मागण्या आहेत तरी काय ?

  • रुग्णालयांमधील सुरक्षा विमानतळाहून कमी नसावी.
  • रुग्णालयांना सुरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करणे आणि सक्तीचे सुरक्षा हक्क देणे ही पहिली पायरी आहे
  • सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षकांची नेमणूक आणि प्रोटोकॉलचे पालन करता येईल.
  • या भीषण गुन्ह्याची वेळीच आणि पारदर्शक चौकशी व्हावी
  • पीडित डॉक्टरच्या कुटुंबीयांना आपल्या मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर मोठी नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

हे ही वाचा:

कोकणातील चाकरमान्यांचा बोरीवली ते कोकण प्रवास होणार सुखकर; रेल्वे मंत्र्यांची नवी घोषणा

Supriya Sule यांनी घेतला अजितदादांच्या ‘या’ विधानांचा खरपूस समाचार; जाणूयात सविस्तर

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss