spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मित्रपक्षांमध्ये जुंपणार रस्सीखेच; Andheri East Assembly मतदारसंघात होणार दोन वेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन

विधानसभा निवडणूक म्हंटल्यावर प्रचार, दौरे हे तर आलेच परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे नेत्यांवरील जबाबदारी अतिशय महत्वाची असते. विधानसभा निवडणूकीसाठी राज्यामध्ये वातावरण निर्मिती केली जात आहे. सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अशातच सर्वच पक्षांनी आपाआपल्या परीनं निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. तसेच, इच्छुकांनी आता शक्तीप्रदर्शन करण्यासही सुरुवात केली आहे. मुंबई उपनगरातील अंधेरी पूर्व  विधानसभेत सध्या महायुतीच्या दोन मित्र पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही रस्सीखेच सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत. महायुतीत मित्रपक्ष असलेले भाजप आणि शिवसेनेचा एकाच दिवशी एकाच मतदार संघात वेगवेगळा रक्षाबंधन सोहळा पार पडणार आहे. सध्या राजकीय वर्तुळात मुंबई उपनगरच्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू आहे. अंधेरी पूर्व  विधानसभेमध्ये महायुतीत एकत्र असलेले भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष वेगवेगळं शक्तीप्रदर्शन करणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात महायुतीत सगळं आलबेल तर आहे ना? अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.

अंधेरी पूर्वमध्ये भाजप आणि शिवसेनेचा एकाच दिवशी एकाच मतदार संघात वेगवेगळा रक्षाबंधन सोहळा होणार आहे. भाजप आणि शिवसेनेचं वेगवेगळं शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे. अंधेरी विधानसभेत शिवसेना शिंदे गटाकडून प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा इच्छुक तर भाजपकडून मुरजी पटेल इच्छुक आहेत. आता आगामी विधानसभा भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुती म्हणून एकत्रित लढवणार आहे, असं आधीच जाहीर केलं आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडून स्वीकृती शर्मा आणि भाजपचे मुरजी पटेल या दोघांपैकी एकालाच तिकीट दिलं जाईल, यात शंका नाही. त्यामुळे विधानसभेचं तिकीट मिळवण्यासाठी दोन्ही इच्छुक उमेदवारांनी आपापली ताकद दाखवण्यासाठी जंगी कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, मुरली पटेल यांच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः उपस्थित राहणार असल्याचं बोललं जात आहे. एवढंच नाहीतर, स्वीकृती शर्मा यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर राहणार असल्याचं बोललं जात आहे.

अंधेरी पूर्वमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडू शकते. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून देखील तयारी सुरू करण्यात आली आहे. वादग्रस्त माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांचा पक्षप्रवेश करून अंधेरी पूर्व विधानसभेवर दावा केला. तसेच, काही दिवसांपूर्वी बोलताना अमित साटम यांनी महायुतीत अंधेरी पूर्व विधानसभेची जागा भाजपच कमळाच्या चिन्हावर लढणार आणि जिंकणार अशी घोषणा केली आहे.

मोरजी पटेल यांच्या नावार घोषणा केली असता कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्साह :

मुरजी पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. अंधेरी पूर्व विधानसभेचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक झाली. त्यावेळीच शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये या जागेवरून काहीसा वाद झाल्याचं दिसून आलं होतं. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने दिवंगत ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली. नंतर या निवडणुकीतून भाजपच्या मुरजी पटेल यांनी माघार घेतल्यामुळे ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. पोटनिवडणुकीत जरी मुरजी पटेल यांनी माघार घेतली असली तरी आगामी विधानसभेच्या निवडणुकीची त्यांनी तयारी मात्र जोरदार केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे ते जवळचे मानले जातात. तसेच उत्तर भारतीय आणि गुजराती मतदारांची संख्या लक्षात घेता त्यांना मानणारा मोठा वर्ग या ठिकाणी आहे.

हे ही वाचा:

कोकणातील चाकरमान्यांचा बोरीवली ते कोकण प्रवास होणार सुखकर; रेल्वे मंत्र्यांची नवी घोषणा

Kolkata Rape Murder Case : Kolkata हत्याकांडाच्या निषेधार्थ देशभरात डॉक्टरांचा संप; IMA कडून मागण्यांची यादी जाहीर

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss