spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

MPSC Pune Protest: एमपीएससी आंदोलनात विद्यार्थ्यांचा मोठा विजय पण आंदोलन अद्याप कायम; Rohit Pawar यांचे ट्विट चर्चेत

२५ ऑगस्ट २०२४ रोजी आयबीपीएस (IBPS) आणि एमपीएससी (MPSC) या दोन्ही परिक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्या होत्या. यामुळे हजारो विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. या विद्यार्थ्यांसाठी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या २१ ऑगस्ट रोजी आंदोलनासाठी विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरल्या आणि त्यामुळे MPSC सह सरकारची पळापळ सुरू झाल्याचे पाहायला मिळालं. त्यानंतर आता एमपीएससी (MPSC) कडून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु उर्वरित मागण्यांची पूर्तता कारण्यासाठि विद्यार्थ्याचे आंदोलन अद्याप सुरूच आहे. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यावर भाष्य केले आहे.

आयबीपीएस आणि एमपीएससी राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा बाबत गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी प्रयत्नशील होते. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत होता आणि त्यातून आंदोलनही सुरू झाले होते. या संदर्भात आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची बैठक संपन्न झाली. विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा विचार करून बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २५ तारखेची जी महाराष्ट्र राज्य नागरी सेवा परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. याबाबत बोलताना रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत आपली भूमिका मांडलं आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

१) २५ ऑगस्ट रोजी होणारी राज्यसेवेची पूर्व परीक्षा पुढे करण्यात आलेली आहे, पण ती कोणत्या महिन्यात घेण्यात येईल, हे आयोगाने घोषित करावं आणि त्यावर आचारसंहितेचा परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी.

२) राज्यसेवेच्या याच जाहिरातीत कृषीच्या जागांचा समावेश करण्यात यावा, ही विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्याबाबत मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्टता द्यावी.

३) एकत्रित गट-ब आणि गट-क जाहिरात अजून प्रकाशित झालेली नाही. ती कोणत्या दिवशी प्रकाशित करण्यात येईल आणि साधारणतः त्याचा कालावधी एका महिन्याच्या आतच असावा. मुख्यमंत्र्यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली, तर लगेच हा आंदोलनाचा प्रश्न सुटेल.

एकीकडे शासनाच्या हजारो जागा रिक्त आहेत, दुसरीकडे आपल्या #लाडक्या सहकाऱ्यांना फायदा व्हावा म्हणून नियमांना बाजूला सारून #कंत्राटी_भरती चा सपाटा लावला आहे…. जर जागा रिक्त आहेत तर एकत्रितची जाहिरात का काढत नाहीत?

विद्यार्थ्यांची भूमिका रास्त आहे, मी विद्यार्थ्यांच्या भूमिकेसोबत आहे. शासनाने देखील विद्यार्थ्यांची भूमिका समजून घेत संवेदनशीलपणा दाखवावा…

एमपीएससी ने परीक्षा ढकलली पुढे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची बैठक गुरुवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आली होती. आज आयोजित केलेल्या आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. २५ ऑगस्ट २०२४ रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन (MPSC) यांच्यामार्फत देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

Badlapur School Case: कारवाईला उशीर करणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्याचे Devendra Fadnavis यांचे आदेश

बदलापूरवरील घटनेवर हरभजन सिंग संतापला, एकनाथ शिंदेंना टॅग करत म्हणाला..

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss