spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

डोळ्याची काळजी कशी घ्यावी?

डोळे किंवा नेत्र जीवधारींचा तो अंग आहे जो प्रकाशाच्या प्रति संवेदनशील आहे.

आजच्या बदलत्या आणि अनियमित जीवनशैलीमुळे ब-याच जणांची डोळ्यांची दृष्टी कमी होत असल्याची तक्रार आहे. चुकीचा आहार आणि अती कामाचा ताण यामुळे बरेच जण त्यांच्या डोळ्यांची निगा योग्यप्रकारे राखत नाहीत. डोळे हा फार नाजूक अवयव आहे. वाढत्या वयात तर ते अधिक संवेदनशील असतात. त्यामुळे आधीच योग्य काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. कारण डोळे नसले तर आपण काहीच पाहु शकणार नाही व त्याचा अनुभव सुद्धा घेऊ शकत नाही. त्यांची काळजी घेणे आवश्यक असते. डोळे किंवा नेत्र जीवधारींचा तो अंग आहे जो प्रकाशाच्या प्रति संवेदनशील आहे.

डोळ्याची काळजी –

  • डोळ्यांना दिवसातून दोन ते तीन वेळा थंड पाण्याने धुवा.
  • डोळ्यांचे स्वास्थ्य सुधारण्यासाठी दररोज सकाळी चप्पल न घालता गवतावर चालावे.
  • उन्हात जाताना सनग्लासेसचा वापर करा. यामुळे डोळ्यांची हानी होत नाही.
  • दीर्घकाळापर्यंत कॉम्प्युटर तसेच पुस्तक वाचल्याने डोळ्यांवर नकारात्मक प्रभाव पडतो. म्हणून 10 मिनिटांच्या एक लहान ब्रेक घ्यावा. या वेळेत स्क्रीनवरून डोळे सरकवून दूरवर दृष्टी टाकावी व पापण्यांची उघडझाप करावी.

  • दोन्ही हात एकमेकांवर चोळून ते गरम झाल्यावर डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांना आराम मिळतो.
  • झोपण्याआधी डोळ्यांना केलेला मेकअप काढा. रात्री झोपताना डोळ्यांना मेकअप ठेवणे धोक्याचे असते. यामुळे डोळ्यांची दृष्टी कमी होण्याची दाट शक्यता असते. मेकमुळे डोळ्यांची जळजळ होण्याची शक्यता असते.
  • प्रवास करताना पुस्तके वाचू नका.
  • रात्रीची झोप पूर्ण करा अर्धवट झोप होणे आरोग्यासाठी हानिकारक होऊ शकत.
  • आहारामध्ये पालेभज्याचा समावेश करा.
  • जागरण कमी करा.
  • डोळ्यांना थंडावा देण्यासाठी बटाटा खूप फायदेशीर आहे. यासाठी बटाट्याचे पातळ काप करून डोळ्यांवर ठेवा आणि अर्ध्या तासानंतर काढा.

हे ही वाचा:

चिप प्रकल्पामुळे खरेदी वाढली, एकाच दिवसात वेदांता कंपनीचे शेअर्स १३% वाढले

लालबागच्या राजाच्या दरबारी ‘या’ तारखेला रंगणार सोन्या-चांदीच्या वस्तूंचा लिलाव

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss