spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

केवळ ७ दिवसांत शाहरुख खान करणार फाईट सीनचे शूट

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Bollywood actor Shah Rukh Khan) त्याची एक छोटी भूमिका साकारताना दिसला होता.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Bollywood actor Shah Rukh Khan) त्याची एक छोटी भूमिका साकारताना दिसला होता. जो प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात आवडला आहे. याशिवाय त्याने ‘लाल सिंह चड्ढा’ (Lal Singh Chadha) या चित्रपटात देखील छोटेसे काम केले आहे. त्याचबरोबरआता शाहरुख खानचे चाहते त्याच्या मुख्य भूमिकेतील चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुख्य भूमिकेतील शेवटचा चित्रपट हा २०१८ साली प्रदर्शित झाला होता. झिरो (Zero) हा त्याचा शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर शाहरुख खानचा एकही मुख्य भूमिकेतील चित्रपट आला नाही. परंतु आता आगामी वर्षात म्हणजेच २०२३ मध्ये अभिनेता शाहरुख खान आपल्यला तीन चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्यातलाच एक त्याचा ‘जवान’ (Jawan) चित्रपटही आहे . शाहरुख खानच्या या चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

 मीडिया रिपोर्ट्सनुसार, जवान या चित्रपटाचे दिग्दर्शक एटली कुमार आहेतर. या चित्रपटाच्या अँक्शन सीक्वेन्सच्या शूटिंगमध्ये आणखी २०० महिलांचा सहभाग असेल. तसेच या चित्रपटासाठी शाहरुख खान या आठवड्यात चेन्नईमध्ये एका अँक्शन सीनचे शूटिंग करणार आहे. यासाठी मोठ्या सेटअप व्यतिरिक्त, एटली कुमार यांनी स्वतः मुंबईत २००-२५० महिला व्यवस्थापन अधिकारी क्राउडसोर्स केले आहेत. या आठवड्यात शूटिंगसाठी चेन्नईला रवाना होणार आहेत. चित्रपटाचा जबरदस्त फाईट सीक्वेन्स ७ दिवसांत शूट केला जाणार आहे. यानंतर शाहरुख खान पुढील तीन आठवडे चित्रपटाच्या इतर भागांचे शूटिंग करणार आहे.

शाहरुख खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ‘जवान’ चित्रपटाव्यतिरिक्त तो दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदचा ‘पठाण’ चित्रपट आणि दिग्दर्शक राजकुमार हिरानीच्या ‘डंकी’ चित्रपटात आपल्याला दिसणार आहे. ‘पठाण’ हा चित्रपट जानेवारी २०२३ मध्ये आणि ‘डंकी’ चित्रपट डिसेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याचवेळी, एटली कुमार दिग्दर्शित शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट जून २०२२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत विजय सेतुपती, नयनतारा आणि सान्या मल्होत्रा ​​देखील दिसणार आहेत.

हे ही वाचा:

Engineer’s Day 2022: भारतातील पहिली महिला इंजिनिअर कोण होती?

अभियंता दिवस २०२२: अभियंता दिन का साजरा केला जातो? कोण होते एम विश्वेश्वरय्या?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss