spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

PM Narendra Modi जाणार पाकिस्तानला? Shehbaz Sharif यांच्याकडून बैठकीचे निमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना शहाबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी पाकिस्तान भेटीचे निमंत्रण दिले आहे. शहाबाज शरीफ यांनी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) इतर नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आमंत्रित केले आहे. कौन्सिल ऑफ गव्हर्नमेंट च्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी हे निमंत्रण देण्यात आले असून कौन्सिल ऑफ गव्हर्नमेंटची बैठक (CHG) १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. गेल्या आठ वर्षांत पहिल्यांदाच पाकिस्तानकडून भारताच्या पंतप्रधानांना निमंत्रिक करण्यात आले असून यामुळे या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. तसेच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानला जाणार का नाही याकडे सगळ्या जगायचे लक्ष लागून राहिलेले आहे.

सध्या कौन्सिल ऑफ गव्हर्नमेंटचे अध्यक्षपद पाकिस्तानकडे आहे. भारत – पाकिस्तान या देशांमधील वर्षानुवर्षे चालत आलेल्या तणावपूर्ण संबंधांमुळे या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावल्यास ती फार महत्वाची ठरणार आहे. आता या बैठकीसाठी पंतप्रधान मोदी स्वतः जाणार कि त्यांच्या ऐवजी भारतआचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एखाद्या मंत्र्याला पाठवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

कौन्सिल ऑफ गव्हर्नमेंटची बैठक हि दुसरी सर्वात महत्वाची बैठक मानली जाते. सध्या याचे अध्यक्षपद पाकिस्तानकडे असून १५ आणि १६ ऑकटोबर रोजी हि बैठक पार पडणार आहे. पंतप्राधन मोदी हे साधारणपणे राष्ट्राध्यक्षांच्या शिखर परिषदेत सहभागी होत असतात. पारंतू महिन्याभरापूर्वी पार पडलेल्या संसदीय अधिवेशनामुळे ते कझाकिस्तान येथे होत असलेल्या बैठकीत सहभागी होऊ शकले नव्हते. त्यांच्याऐवर्जी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. आता पाकिस्तानमध्ये होणाऱ्या बैंठकीत भारताकडून कोण नेते उपस्थित राहणार यावर अद्याप निर्णय झालेला नाही. भारत आणि पाकिस्तान हे दोन्हीही एससीओचे पूर्ण सदस्य आहेत. या संघटनेचे नेतृत्व चीन आणि रशिया करत असून भारताचे या बैठकीत उपस्थित राहणे फार महत्वाचे आहे. २०२३ मध्ये भारतात झालेल्या एससीओच्या बैठकीत पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो जरदारी सहभागी झाले होते. त्यामुळे बैठकीत भारताकडून कोण नेते उपस्थित राहणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

हे ही वाचा:

आरोग्यासाठी उपयुक्त असे मशरूमचे फायदे तुम्हाला माहिती आहे का ?

ICT NICE तर्फे Startup ला मिळाली एक नवी सुवर्णसंधी

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss