spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Dahihandi 2024 special : ठाण्यातील हंडयां पाहायच्यात आहेत ? ; मग या.. पाहुयात ही बक्षिसांची लयलूट

दहीहंडीची पंढरी म्हणून ठाणे आणि मुंबईला ओळखले जाते. दहीकाला म्हणजे आबालवृद्धांच्या आवडीचा असा हा सण. हा केवळ सण नव्हे तर एक मोठा उत्सव असतो. हा उत्सव प्रत्येक जण तेवढ्याच आनंदाने, उत्साहाने साजरा केला जातो.  या दहीकालेसाठी सर्वजण उत्सुक असतात. गेल्या काही वर्षात याच उत्सवाला आता स्पर्धेचं रूप देण्यात आलं आहे. ज्यामुळे हा उत्सव उत्सव कमी आणि स्पर्धा अधिक वाटायला लागला आहे. काही ठिकाणी तर या खेळाला किंवा उत्सवाला राजकीय सोहळा बनवण्यात आले आहे. याच दहीहंडी उत्सवानिमित्त (Dahihandi Mumbai Thane) मुंबई, ठाणे परिसरात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंच दहीहंड्या बांधण्यात आल्या असून या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगणार आहे. संस्कृती युवा प्रतिष्ठान, मनसेची दहीहंडी, टेंबी नाका, स्वामी प्रतिष्ठान, संकल्प प्रतिष्ठान यांसारख्या मोठ्या हंड्या उभारण्यात आल्या आहेत. ठाण्यातील दहीहंड्या कोणत्या ते आपण यातून जाणून घेऊयात.

ठाण्यातील या महत्वाच्या हंड्या आहेत :

  • संस्कृती युवा प्रतिष्ठान :
    प्रताप सरनाईक –  या ठिकाणी प्रो गोविंदाचा आयोजन केलं गेलं आहे. विश्व विक्रम करणाऱ्या पथकाला ११ लाख रुपये दिले जातील. संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या मंचावर ४ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील.
  • मनसे दहीहंडी ठाणे :
    इथे सर्वात आधी सकाळी ९.३० जय जवान गोविंदा मंडळ आणि शिवसाई गोविंदा पथक ९ थर रचणार आहे. राज ठाकरे संध्याकाळी ६ वाजता येण्याची शक्यता आहे. त्यांच्या उपस्थितीत जय जवान गोविंदा पथक १० थर रचून विश्व विक्रम करण्याचा प्रयत्न करणार आहे. इथे १० थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला ११  लाखाच पारितोषिक दिलं जाणार आहे.
  •  टेंबी नाका दहीहंडी :
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हंडी…दुपारी १२.३० वाजता एकनाथ शिंदे कार्यक्रमास्थळी येणार, त्यानंतर दहीहंडीला सुरुवात होणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार, आणि अवधूत गुप्ते  आणि इतर सेलिब्रिटी येतील.
  •  संकल्प प्रतिष्ठान, ठाणे (रवींद्र फाटक, रघुनाथ नगर) :
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स.१०.३० वा. उद्योग मंत्री उदय सामंत यांची उपस्थिती. दु.१ ते ४  दरम्यान सिने अभिनेते सुनिल शेट्टी चंकी पांडे तसेच इतर बॅालिवुड स्टार अवधुत गुप्ते तसेच मराठी सिने सृष्टीमधील दिग्गज कलाकारांची उपस्थिती. सकाळी १० ते रात्री १० पर्यंत अभिनेते सुशांत शेलार यांचा समर्थ व्हिजन प्रस्तुत मनोरंजनपर कार्यक्रम
  •  ठाणे भाजप दहीहंडी (शिवा पाटील):
    स्वामी प्रतिष्ठान (शिवाजी पाटील) मेडोज हिरानंदानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सेलिब्रिटी गणेश आचार्य आणि टीम कॉमेडियन कृष्णा अवधूत गुप्ते आणि टीम सरदार प्रतापराव गुजर यांच्यावर स्पेशल परफॉर्मन्स.
  •  राजन विचारे आयोजित दहीहंडी :
    इथे दुपारी २ पर्यंत आदित्य ठाकरे येतील.
  •  गोकुळ दहीहंडी, कॅसलमील चौक (भाजप, कृष्णा पाटील) :
    एकुण ५५ लाखांची बक्षिसे

हे ही वाचा:

पुतळे, स्मारकं ही फक्त आपल्यासाठी राजकीय सोय राहिली आहे ; Raj Thackeray यांचा मालवण घटनेवर प्रक्षोभ

“विकृत मानसिकता सत्ताधाऱ्यांमुळे होत असेल तर ही शोकांतिका”; Praniti Shinde यांचा सत्ताधाऱ्यांना टोला

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss