spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Mahyuti चे राजकीय गणित बदलणार?; Fadnavis यांचे Shivaji Patil यांच्या नावाचे अप्रत्यक्ष संकेत

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी दौरे सुरु आहेत. प्रत्येक पक्ष हे आपला उमेदवार कसा निवडून येईल या दृष्टीने विचार करत आहेत. या निवडणुकीत आपली पोळी कशी भाजेल, लोकांच्या मनात स्थान कसे निर्माण होईल व अत्यधिक मते कशी प्राप्त होतील या दिशेने चोख काम पार पाडण्यासाठी सुरुवात केलेली दिसून येते. विधानसभा निवडणुकीचे राजकीय पक्षांना वेध लागलेले असल्यामुळे प्रत्येक जण कंबर कसून कामाला लागले आहेत. सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजत आहेत. सर्वच पक्षांनी आपाआपल्या परीनं निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. त्यातच आता चंदगडमधून शिवाजी पाटील यांचे नाव फडणवीस यांनी घेऊन विधानसभेसाठी अप्रत्यक्ष संकेतच दिले आहेत. त्यामुळे आता महायुतीतील अंतर्गत राजकारण कस फुलेल हा प्रश्नच आहे.

ज्या पक्षाचा आमदार, ती जागा त्या पक्षाची असं सर्वसाधारण महायुतीमधील जागावाटपाचं सूत्र असताना आता त्याला कुठेतरी छेद मिळत असल्याचं दिसत आहे. कोल्हापुरातील चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये त्याची प्रचिती येण्याची शक्यता आहे. ठाण्यातील एका दहीहंडीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरातील चंदगड विधानसभेसाठी अप्रत्यक्षपणे शिवाजी पाटील यांच्या नावाचे संकेत दिले आहेत. ठाण्याप्रमाणे चंदगडचे लोकही शिवाजी पाटलांना भरभरून आशीर्वाद देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश पाटील हे आमदार आहेत. पण भाजपचे शिवाजी पाटील हे विधानसभेसाठी इच्छुक आहेत. शिवाजी पाटील हे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय समजले जातात. २०१९ साली त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या राजेश पाटील (Rajesh Patil) यांना निसटता विजय मिळाला होता.

पराभव झाल्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून शिवाजी पाटील यांनी भाजपचं काम सुरू केलं आणि चंदगड तालुक्यामध्ये भाजप घराघरात पोहोचवला. त्यामुळे यंदा भाजपकडून शिवाजी पाटील हेच उमेदवार असणार हे नक्की होतं. पण अजित पवार सत्तेत आले आणि इथली गणितं बदलली. चंदगडचे आमदार राजेश पाटील हे अजित पवारांसोबत गेल्याने शिवाजी पाटलांची गोची झाल्याचं दिसतंय. ज्या ठिकाणी जो आमदार ती जागा त्या पक्षाला असं सर्वसाधारण चित्र असल्याने भाजपच्या इच्छुकांची अडचण झाली. त्यामुळेच भाजपचे जिल्ह्यातील बडे नेते समरजित घाटगे यांनी शरद पवारांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय. तसाच धक्का चंदगडमध्ये बसू नये यासाठी देवेंद्र फडणवीस सक्रिय झाल्याचं दिसतंय. त्यामुळे त्यांनी अप्रत्यक्षपणे का होईना पण चंदगडमधून शिवाजी पाटील हेच उमेदवार असतील हे सूचवलं आहे.

अजित पवार गटाचे आमदार राजेश पाटलांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आमदार म्हणून चंदगडची जागा आपल्यालाच मिळेल असं समजून ते कामालाही लागले आहेत. तर कोणत्याही परिस्थितीत यंदाची निवडणूक लढवायचीच असा निश्चय शिवाजी पाटलांनी केला आहे.

हे ही वाचा:

Sharad Pawar यांच्या पाठोपाठ आता मिळणार Mohan Bhagwat यांनाही Z+ सुरक्षा

Dahihandi 2024 special : गोपाळकालाची पूर्वसंद्या होणार सुरमई ; गोविंद रे गोपाळा..नाद रंगणार पुणे-नवी मुंबईत

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss