spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

हाडे मजबूत होण्यासाठी ‘या’ पदार्थांचा जेवणात करा समावेश

हाडे मजबूत करण्यासाठी आपण पौष्टीक पदार्थाचे सेवन करतो.

हाडे मजबूत करण्यासाठी आपण पौष्टीक पदार्थाचे सेवन करतो. हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शिम आणि व्हिटॅमिनची गरज असते. हाडे मजबूत असेल तर शरीर सदृढ राहते. पण अनेकदा आपण असे काही पदार्थ खातो जे आपल्याला अधिक स्वादिष्ट वाटते. मात्र, हेच पदार्थ आपले हाडे कमकूवत करतात. याचा आपल्याला अंदाजही नसतो. शरीराची हालचाल ही हाडांशी निगडित असल्याने ती बळकट राहणे खूप गरजेचे आहे. हाडे मजबूत नसल्यास त्याचा परिणाम आपल्याला म्हातारपणी होतो. त्यामुळे सुरुवातीपासूनच आपण हाडांच्या मजबुतीची काळजी घेणे आवश्यक आहे.

हे ही वाचा : खार येथील धर्मा ऑफिसमध्ये अयान मुखर्जीसोबत रणबीर आणि आलिया

 

अंड्यामध्ये प्रोटीन मोठ्या प्रमाणात असतं. अंड खाल्ल्यामुळे शरीरातली प्रोटीनची गरज पूर्ण होते आणि त्यामुळे हाडं मजबूत होतात.

हाडं मजबूत ठेवण्यासाठी पालक देखील खाऊ शकता. पालकामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे हाडे चांगली राहतात.

हाडांच्या कॅल्शिम वाढीसाठी तुम्ही पांढरे तिळाचे सेवन करू शकता. तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिम , मॅग्नेशिअम, झिंक यासारखे गुणधर्म असतात. त्यामुळे हाडे मजबूत होतात.

कॅल्शियम व्यतिरिक्त दूधात पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन डी, ए आणि बी१२ ही असतात, ते सुद्धा हाडांसाठी आवश्यक असतात.

हाडे मजबूत करण्यासाठी दुधाचे ही तुम्ही सेवन करू शकता. तसेच तुम्ही रोजच्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या यांचा ही देखील समावेश करता येतो.

हाडे मजबूत ठेवण्यासाठी तुम्ही काजू, बदाम , अक्रोड , पिस्ता हे देखील तुम्ही सेवन करू शकता. यांचा मध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिम असते. आणि हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शिमची गरज असते.

नाचणी मध्ये कॅल्शिम जास्त प्रमाणात असते. त्यामुळे हाडे मजबूत होतात आणि फ्रॅक्चरचा धोका कमी होतो. उष्णता कमी करण्यासाठी तुम्ही नाचणीचा वापर करू शकता.

हाडांच्या मजबुतीसाठी आहारामध्ये मासे , मांस ,यांचा समावेश करू शकता. यामध्ये ही कॅल्शिम आणि व्हिटॅमिन – D असते. बकऱ्याच्या पायापासून पायासूप बनवून पिणे ते देखील हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

हे ही वाचा :

ग्रीन टी मुळे शरीरावर होतील दुष्पपरिणाम

 

Latest Posts

Don't Miss