spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Rajkot Fort Dispute: कोंबडी चोरांना आम्ही घाबरत नाही, Aaditya Thackeray यांचा राणेंना टोला

Rajkot Fort Dispute: राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या प्रकरणी आता महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते मैदानात उतरले आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे पाहणीसाठी गेले असता त्यावेळी नारायण राणे समर्थक आणि शिवसेना उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रवेशद्वारावरच मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. यावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असताना राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. आता शिवसेना उबाठा (Shivsena UBT) गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी यावर भाष्य करत नारायण राणेंसह (Narayan Rane) महायुती सरकारवर (Mahayuti Government) टीका केली आहे.

आज (गुरुवार, २९ ऑगस्ट) माध्यमांशी संवाद साधत ते म्हणाले, “काल आपण पाहिला असेल अशा धमक्या देतात त्यांना आणि कोंबडी चोरांना आम्ही घाबरत नाही. हे असं करणं योग्य नाही. काल ज्याप्रकारे काही ठराविक लोकांनी पोलिसांना शिवी दिली, धमकी दिली एका पोलिसाला दगड बसलेला आहे. आणि तो वैभव नाईक यांना पोलीस संरक्षण मिळणे गरजेचे आहे. हे सगळीकडेच आता घडायला लागलं आहे सर्व घोटाळे भाजपचे बाहेर यायला लागले आहेत. एका पेपरमध्ये बातमी आली होती प्रधानमंत्र्यांसाठी बनवलेल्या हेलिपॅडमध्ये या खोके सरकारने पैसे काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. सहा फुटाची परवानगी स्तन ३५ फुटाचा पुतळा मग बनवला का होता? घाई गडबडीत का बनवला? ” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले, “स्टॅच्यू ऑफ लिबर्टी १३८ वर्ष टिकलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अजून टिकला आहे. हाच पुतळा खोके सरकारी बनवलेला मोदींनी अनावरण केलेला ते काम कोणाला दिला तो माणूस कुठे आहे? तो फरार झाला आहे का? त्याला पळून जायला भाजपने मदत केली आहे का याच्याबद्दल देखील समिती बसवली पाहिजे. बदलापूर मध्ये काय झालं या समितीचा पण रिपोर्ट लोकांसमोर आला पाहिजे. कि ती एफ आय आर का नाही घेतली? हा भाजपने पंतप्रधान मोदींच्या केलेला अपमान आहे. की त्यांच्या हातून अशा पुतळ्याचं उद्घाटन केलं की ज्याला सांस्कृतिक विभागाकडून परवानगी नव्हती,” असा आरोप त्यांनी यावेळी केला.

हे ही वाचा:

Narayan Rane आणि त्यांचे चाराणे-बाराणे हे कळसुत्री बाहुल्या, मुख्य सूत्रधार Devendra Fadnavis: Sushma Andhare

मालवण मध्ये जे झाले ते महाराष्ट्राच्या गृहखात्यावर थुंकण्याचा प्रयत्न; Devendra Fadnavis गृहमंत्री म्हणून लाज वाटली पाहिजे: Sanjay Raut

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss