spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

गायक दलेर मेहंदीला कोर्टाने दिला दिलासा

पंजाबी गायक दलेर मेहंदीला १९ वर्षे जुन्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. यामुळे दलेर मेहंदीला (Daler Mehndi) तुरुंगात जावे लागले होते.

पंजाबी गायक दलेर मेहंदीला १९ वर्षे जुन्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. यामुळे दलेर मेहंदीला (Daler Mehndi) तुरुंगात जावे लागले होते. आता पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने गायक दलेर मेहंदीला दिलासा (Bail) दिला. २००३ च्या मानवी तस्करी प्रकरणात दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या पटियाला कोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

हे १९ वर्षे जुने प्रकरण मानवी तस्करीशी संबंधित आहे. दलेर मेहंदीसोबत भाऊ समशेर सिंगही या प्रकरणात आरोपी होता. २०१७ मध्ये त्याचे निधन झाले. मार्च २०१८ मध्ये दलेर मेहंदी (Daler Mehndi) या प्रकरणात दोषी आढळला होता. त्यानंतर दलेर मेहंदीला आयपीसीच्या कलम ४२० आणि १२०-बी मध्ये दोषी ठरवण्यात आले होते.

 पंजाब-हरयाणा उच्च न्यायालयाने मानवी तस्करी प्रकरणात प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी याला सुनावलेल्या शिक्षेविरुद्धच्या अपीलवर पंजाब सरकारला नोटीस बजावून उत्तर मागितले होते. १६ मार्च २०१८ रोजी पटियालाच्या ट्रायल कोर्टाने त्याला मानवी तस्करीच्या १९ वर्ष जुन्या प्रकरणात दोषी ठरवले आणि दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरुद्ध दलेर मेहंदीने अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पटियाला यांच्यासमोर अपील दाखल करून आव्हान दिले होते. चार वर्ष अपीलावर सुनावणी केल्यानंतर न्यायालयाने १४ जुलै २०२२ रोजी दलेर मेहंदीचे अपील फेटाळून लावत शिक्षा कायम ठेवली होती. अपील फेटाळल्यानंतर दलेर मेहंदीने उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करून आव्हान दिले. याचिकेत मेहंदीने अपील प्रलंबित असेपर्यंत आपल्या शिक्षेला स्थगिती देण्याची विनंती उच्च न्यायालयाकडे केली आहे. दलेर मेहंदीची अपील आणि शिक्षेला स्थगिती देण्याच्या मागणीवर उच्च न्यायालयाने पंजाब सरकारला नोटीस बजावून उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते.

बक्षी सिंग नावाच्या व्यक्तीने पटियाला सदर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दलेर मेहंदी आणि भाऊ समशेर यांनी त्याला कॅनडाला पाठवण्यासाठी १३ लाख घेतल्याचा आरोप केला होता. परंतु, ना कॅनडाला पाठवले ना पैसे परत केले. बक्षी सिंहसोबत इतर ३० तक्रारकर्ते होते. ज्यांनी दलेर मेहंदीवर असे आरोप केले होते.

Latest Posts

Don't Miss