PM Narendra Modi यांच्या हस्ते ९ महिन्यांपूर्वी उदघाटन करण्यात आलेल्या मालवण येथील शिवछत्रपतींचा पुतळा आज सकाळी कोसळला. पुतळा कोसळल्यानंतर कुडाळ विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवप्रेमींनी कंत्राटदाराच्या कार्यालयाची तोडफोड केली. या घटनेमुळे महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे.