spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी सैराट फेम ‘सुरज पवार’ला अटक होण्याची शक्यता

अहमदनगर जिल्ह्यात एक आर्थिक फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक बातमी सामोर येत आहे. आणि या प्रकरणात महत्वाची बाबा म्हणजे सैराट फेम प्रिन्स अर्थात अभिनेता सुरज पवार याचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना पोलिसांनी अटक देखील केलं आहे. दत्तात्रय क्षिरसागर ( रा. नाशिक ), आकाश शिंदे अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

हेही वाचा : 

महिलांना वजन कमी करण्यासाठी ‘एरोबिक’ व्यायाम एक सर्वोत्तम उपाय

मंत्रालयात नोकरीला लावण्यासाठी पाच लाख रूपयांची संशयितांकडून मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी नेवासा तालुक्यातील महेश वाघडकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केलं आहे. संशयितांकडे पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर या प्रकरणात अभिनेता सुरज पवार याचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणी आता सुरज पवार याला देखील अटक करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

वाघडकर यांच्या फिर्यादीवरून फसवणूक करणे, बनावट शिक्के आणि दस्तऐवज तयार करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपींवर कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिनेता अजय देवगणची मोठी घोषणा

Latest Posts

Don't Miss