spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

MVA च्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून BJP कडून निषेध आंदोलन

मालवणमधील राजकोट (Rajkot) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी (Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse) राज्यातील महायुती सरकारविरुद्ध (Mahayuti Government) महाविकास आघाडीकडून (Mahavikaas Aghadi) आज (रविवार, १ सप्टेंबर) “जोडो मारो आंदोलन” पार पडत आहे. मुंबईतील हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंत हा मोर्चाचे नेण्यात येणार आहे. या नांदोलनांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार सुप्रिया सुळे, राज्यसभा खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह महाविकास आघाडीमधील इतर प्रमुख नेते सहभागी होणार आहे. या आंदोलनासाठी मुंबईसह राज्यातील इतर भागांमधून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित असल्याचे दिसत आहे. अश्यातच आता भाजपच्या (BJP) वतीनेही मविआच्या आंदोलनाविरोधात आंदोलन करण्यात आले आहे. मुंबईतील दादर परिसरात भाजपकडून मविआविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात येत आहे.

महाविकास आघाडीच्या जोड्या मारो आंदोलनाच्या निषेधार्थ आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्या नेतृत्वात दादर परिसरात भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. वेडे वटवटराव, मुंग्या राऊत, करामती काका, पेंग्विन राव, नाना तळीराम अशा आशयाचे फलक हातात घेऊन विरोधकांना प्रत्युत्तर देत भाजपच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलन केले. याबाबत बोलताना आमदार प्रसाद लाड यांनी आपल्या ‘X’ अकाउंटवरून भाष्य केले आहे. ते यावेळी म्हणाले, “महाभकास आघाडीच्या आंदोलनाला… आंदोलनाने उत्तर…महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आजवर महाराष्ट्राचे वैचारिक नुकसानच केले असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे केवळ राजकारण केलेले आहे. सिंधूदुर्ग येथील घटना दुर्दैवी आहेच! परंतु महाविकास आघाडीचे नेते केवळ राजकारण करत असून, या आंदोलनाला दादर(पूर्व) येथे आंदोलनाने उत्तर दिले आणि महाविकास आघाडीचे खरे रुप सर्वांच्या समोर आणले,” असे ते म्हणाले.

नवी मुंबईत राजकोट प्रकरणात दोषींवर कारवाईसाठी भाजपचे आंदोलन

मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला असल्याने सरकार विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन पार पडत आहे. तर नवी मुंबईत या घटनेचा निषेध म्हणून भाजपनेही आंदोलन सुरू केले आहे. नवी मुंबईत आज अध्यक्ष संदीप नाईक यांच्या नेतृत्वात वाशी मधील छ्त्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे कार्यकर्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss