spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Lalbaug Bus Accident: दारुड्याने स्टिअरिंग हिसकावलं, लालबागमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात, ९ जण जखमी

Lalbaug Bus Accident: मुंबईमधील लालबागमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मुंबईतील गजबजलेल्या लालबाग परिसरात बेस्ट बसने अनेक वाहनांना धडक दिली असून या अपघातात नऊ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. बसमधून प्रवास करणाऱ्या मद्यधुंद प्रवाशाचा बस ड्रयव्हरसोबत वाद झाल्यामुळे झालेल्या झटापटीतून हा अपघात झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेत जखमी झालेल्या नऊ पादचाऱ्यांपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

गणेशोत्सव तोंडावर आला असताना आणि रविवारी सुट्टीचा दिवस असलयामुळे लालबाग परिसरात नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती. अश्यातच बेस्टची ६६ क्रमांकाची बस दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पिअर येथून सायनमधील राणी लक्ष्मीबाई चौक येथे जात होती. यावेळी बसमधील एका मद्यधुंद प्रवाशाने ड्रायवरसोबत हुज्जत घालायला सुरुवात केली. शेवटी हा वाद विकोपाला गेल्याने. मद्यधुंद प्रवाशाने बस लालबाग परिसरातुन जात असताना ड्रायव्हरसोबत झटपट करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने स्टिअरिंग हिसकावल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस फुटपाथच्या दिशेने गेली. त्यामुळे पादचाऱ्यांना आणि वाहनांना बसची धडक बसली.

या धडकेमुळे ९ पादचारी जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. चालकाने वेळीच बस नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टाळलं. दारुड्या प्रवाशाचे नाव दत्ता शिंदे असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. तसेच बसमधील चालक आणि वाहक या दोघानांही काळाचौकी पोलीस स्टेशनला नेण्यात आले आहे.

नेमकं काय घडलं?

ऐन रविवार आणि त्यातच गणेशोत्सव तोंडावर असल्याने लालबाग परिसरात मोठी गर्दी होती. बेस्ट प्रशासनाची ६६ क्रमांकाची बस बॅलार्ड पियरवरून सायनमधील राणी लक्ष्मीबाई चौक येथे जात होती. बसमधून दत्ता शिंदे नामक मद्यधुंद प्रवासी प्रवास करत होता. बस लालबागजवळील गणेश टॉकीज परिसरात आली असता टाचे बसमधील वाहकासोबत वाद झाले. या वादाचे पर्यवसान झटापटीत झाले. मद्यधुंद प्रवाश्याने चालकाजवळ जात बसचे स्टिअरिंग फिरवायला लागला. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस वेडीवाकडी धावत फुटपाथवर चढली. यात पादचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात धावपळ झाली आणि ९ जण जखमी झाले आहेत. जखमींना त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. दत्ता शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी पार पडत आहे.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss