सध्या सोशल मीडियावर (Social media) अनेक व्हिडिओ हे वारंवार शेअर होत असतात. यामध्ये अनेक व्हिडीओ हे गंभीर असतात तर काही व्हिडिओ हे मजेशीर, गंमतीशीर असतात. आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही पोट धरून हसाल. तुम्ही या व्यक्तीच्या जागी असता तर एवढी गडबड केल्यावर नक्कीच डोकं धरून बसले असते. पण त्या व्यक्तीची चूक काय तर एक सेल्फी.
एक सेल्फी तुम्हाला किती महाग पडू शकतो याच उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ आहे. सेल्फीची क्रेझ तुम्हाला माहीत आहेच. पण सेल्फीच्या नादात इतकं नुकसान झाल्यानंतर तुमची झोप नक्कीच उडून जाईल. या व्यक्तीने बोटीत उभं राहून माशासोबत सेल्फी काढला. लागोपाठ सेल्फी काढल्यानंतर शेवटी असं काही घडतं की पाहून तुम्हाला हसू नक्कीच आवरणार नाही .
— Tansu YEĞEN (@TansuYegen) September 11, 2022
हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती बोटीत बसल्याचा आनंद घेतोय. त्याच्या एका हातात फोन आणि दुसऱ्या हातात मासा आहे. खरंतर मासा पकडल्यानंतर तो इतका आनंदी होतो की तो त्याच्यासोबत सेल्फी काढायला लागतो. पण माशासोबत सेल्फी काढण्यात तो इतका हरवून जातो की फोटो काढल्यानंतर जेव्हा मासा पाण्यात फेकण्याची वेळ येते तेव्हा तो माशाच्या जागी स्वःचा फोनच फेकतो. माशाऐवजी फोन फेकून दिल्याचं समजताच तो दु:खी होऊन पश्चाताप करतो आणि फोनकडे पाहण्यासाठी पुढे वाकतो.
लोक या व्हिडीओचा भरपूर आनंद घेताना दिसत आहेत. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला १ कोटी २५ लाखांहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच १ लाख ५० हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. यावर यूजर्सकडून खूप मजेदार प्रतिक्रिया येत आहेत.
हे ही वाचा:
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’चा प्रवास आता महागणार
Navratri 2022 : नवरात्र हा सण का साजरा केला जातो ?