उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सोबत राहताना कोट्यावधी रूपयांकडे पाठ फिरवणाऱ्या सर्व आमदारांना विधानसभेला पुन्हा तिकिटे देण्याचा निर्णय मातोश्रीने घेतलाय. शिल्लक राहिलेल्या सात आमदारांपैकी सर्वाधिक नाराजी असलेल्या शिवडी मतदार संघातील अजय चौधरी (Ajay Chaudhari) यांना यामुळे लॅाटरी लागणार आहे. मात्र चौधरींच्या उमेदवारीने या मतदार संघात मनसेला jackpot लागणार आहे.