spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

टेनिस विश्वाला मोठा धक्का… ‘या’ खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा

सेरेना विलियम्सच्या निवृत्तीच्या घोषणेतून सावरणाऱ्या टेनिस चाहत्यांना आणखी धक्का बसला आहे. टेनिस विश्वाचा राजा समजला जाणारा रॉजर फेडरर याने त्याच्या चाहत्यांना नुकताच एक धक्का दिला आहे.

सेरेना विलियम्सच्या निवृत्तीच्या घोषणेतून सावरणाऱ्या टेनिस चाहत्यांना आणखी धक्का बसला आहे. टेनिस विश्वाचा राजा समजला जाणारा रॉजर फेडरर याने त्याच्या चाहत्यांना नुकताच एक धक्का दिला आहे. रॉजर फेडररने निवृत्तीची घोषणा केली आहे. पण फेडरर थेट निवृत्ती घेणार नाही तर आता एक स्पर्धा होणार आहे आणि या स्पर्धेत तो आपला अखेरचा सामना खेळणार आहे.

‘टेनिस सम्राट’ रॉजर फेडरर यानं सोशल मीडियावरुन निवृत्तीची घोषणा केली आहे. फेडरर आपल्या प्रदिर्घ करिअरमध्ये तब्बल २० ग्रँड स्लॅम जिंकण्याचा पराक्रम केलाय. पुढील आठवड्यात होणाऱ्या लेव्हर कप २०२२ नंतर फेडरर टेनिस या खेळातून निवृत्ती घेणार आहे. त्यानं ट्वीट करत याबाबतचा निर्णय त्याने जाहीर केला आहे. २३ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर यादरम्यान लेव्हर कप स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेनंतर टेनिस कोर्टवर रॉजर फेडरर दिसणार नाही.

 रॉजर फेडररने नुकतीच व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने आज सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून सर्व चाहत्यांना धक्का दिला. ट्विटरवर ऑडिओ मेसेज शेअर करुन रॉजर फेडररनं त्याच्या चाहत्यांना निवृत्तीबाबत हि माहिती दिली आहे. रॉजरच्या या निर्णयामुळे त्याच्या जगभरातील चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ट्विट केलेला मेसेजलाही नेटकऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून त्याचं टेनिस कायम आठवणीत राहील, अशा भावना चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत.

 २० वेळा ग्रँड स्लॅम विजेता टेनिसपटू रॉजर फेडररने या खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे. तो बऱ्याच दिवसांपासून गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त होता आणि शस्त्रक्रियेनंतर तो पुनरागमन करू शकला नाही. ४१ वर्षीय महान खेळाडूने निवृत्ती जाहीर केल्यानंतर टेनिसचे एक युग संपत असल्याचे मानले जात आहे. फेडररने आपल्या खेळाने अनेक सुवर्ण क्षण संपूर्ण जगाला दाखवले आहेत. त्यांनी एक निवेदन सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, यामध्ये फेडररने सांगितले की, “मी ४१ वर्षांचा आहे. मी २४ वर्षात १५०० हून अधिक सामने खेळले आहेत. टेनिस माझ्याशी इतक्या उदारतेने वागेल असे स्वप्नातही वाटले नव्हते आणि आता मला हे ओळखावे लागेल की माझी स्पर्धात्मक कारकीर्द संपण्याची वेळ आली आहे.”

विशेष म्हणजे रॉजर फेडरर जवळपास ३१० आठवडे एटीपीच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर होता. तो तब्बल २३७ आठवडे सलग रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिला होता. सर्वाधिक आठवडे रँकिंगमध्ये टॉपवर राहण्याचा विक्रम देखील त्याच्याच नावर आहे. तसेच सलग पाच वर्षे युएस ओपन (२००४ ते २००८) ग्रँडस्लॅम जिंकणारा तो एकमेव टेनिसपटू आहे.

हे ही वाचा:

रणवीरने न्यूड फोटोशूट प्रकरणात दिले हे स्पष्टीकरण

T- 20 सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ भारतात दाखल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss