spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आता सावंवाडी ते कणकवली धावणार ट्रेन? नारायण राणेंनी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा

कोकण रेल्वे प्रशासनाने या प्रस्तावित 'टॉय ट्रेन' प्रकल्पाचा प्राथमिक सर्व्हेही केला होता.

आज केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे महाराष्ट्राचे (Maharashtra) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना भेटले. या भेटीदरम्यान त्यांनी तळ कोकणाचे (Konkan) भवितव्य बदलणाऱ्या एका महत्त्वाच्या प्रकल्पाविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. हा प्रकल्प १२७ किलोमीटर लांबीच्या कोकण किनारपट्टी रेल्वे मार्गाचा प्रकल्प आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (Sindhudurg District) सर्व महत्त्वाचे किनारे रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी कणकवली ते सावंतवाडी वाया देवगड मालवण आणि वेंगुर्ला असा हा रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे.

सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. इथला निसर्गरम्य परिसर, मनाला भुरळ पाडणारे समुद्र किनारे, इथले ऐतिहासिक किल्ले, इथली कला संस्कृती हे पर्यटकांचे खास आकर्षण बनले आहे. या बाबी विचारात घेऊन ‘ टुरिस्ट टॉय ट्रेन’ लवकरात लवकर सुरू करावी, अशी आग्रही मागणी राणे यांची आहे. कोकणातील इतर प्रकल्प प्रमाणे जमीन संपादन आणि निधी अभावी हा प्रकल्प जर रखडला नाही, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीला भारतातील सर्वाधिक पर्यटक प्रतिवर्षी भेट देतील यात शंका नाही.

काही वर्षांपूर्वी राणे यांनी मालवण येथे एका कार्यक्रमात याबद्दल सूतोवाचही केला होता. त्यानंतर त्यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यानंतर कोकण रेल्वे प्रशासनाने या प्रस्तावित ‘टॉय ट्रेन’ प्रकल्पाचा प्राथमिक सर्व्हेही केला होता. मात्र त्यानंतर या विषयाला चालना मिळाली नव्हती. ही मूळ कल्पना स्वतः राणे यांचीच असल्याने केंद्रीय मंत्री होताच त्यांनी या विषयाला चालना मिळावी आणि यासाठी प्रयत्न सुरू केले.

हे ही वाचा:

उबरसोबतचा कटू अनुभव शेअर करताच हर्ष भोगलेला चाहत्यांनी दिला ‘उबरवर बहिष्कार घालण्याचा सल्ला…

टेनिस विश्वाला मोठा धक्का… ‘या’ खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss