spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ganeshotsav 2024: आपल्या लाडक्या बाप्पाचे पाण्यातच विसर्जन का केले जाते? जाणून घ्या सविस्तर

यंदा ७ सप्टेंबरला गणेश चतुर्थी या सणाला सुरुवात झाली असून आपल्या लाडक्या बाप्पाचे मोठ्या थाटात आगमन झाले. भाविकांनी मोठ्या थाटामाटात घरोघरी गणपतीचे स्वागत केले. हा उत्सव १० दिवस साजरा केला जात असून लोक त्यांच्या भक्तीनुसार दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस किंवा दहा दिवस गणपतीची पूजा करतात. यानंतर विधीप्रमाणे त्यांचे विसर्जन केले जाते. यावर्षी १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. हिंदू धर्मानुसार गणपतीला पहिले पूजनीय देवता मानले जाते, मग अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशाचे विसर्जन का केले जाते? याचे कारण तुम्हाला माहीत आहे का? यामागे एक पौराणिक कथा दडलेली आहे, ती जाणून घेऊया.

पौराणिक कथेनुसार अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचे पाण्यात विसर्जन केले जाते कारण ते जल तत्वाचे अधिपती आहेत. पुराणानुसार वेद व्यासजी गणपतीला महाभारत सांगत होते आणि बाप्पा ते सलग लिहीत होते. कथा सांगताना वेद व्यासजींनी डोळे मिटले. ते सलग दिवस महाभारत पूर्ण सांगत राहिले, तोपर्यंत बाप्पा ते लिहीत राहिले. पण दहा दिवसांनी जेव्हा वेद व्यासजींनी डोळे उघडले तेव्हा त्यांना दिसले की गणपतीच्या शरीराचे तापमान खूप वाढले आहे. गणेशाचे शरीर थंड करण्यासाठी वेद व्यासजींनी बाप्पाला पाण्यात आंघोळ घातली, ज्यामुळे बाप्पाचे शरीर थंड झाले. तेव्हापासून गणेश विसर्जन हे गणपतीच्या शरीराला थंड करण्यासाठीच केले जाते, अशी धार्मिक मान्यता आहे.

निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीचे एक चक्र असते. ज्या गोष्टीची सुरुवात होते तिचा शेवट हा नक्कीच होतो. आणि ज्याचा शेवट होतो ते पुन्हा निर्माण होते. निसर्गाचा हा कालचक्राचा नियम गणेश विसर्जनातून दिसून येतो. निसर्गाच्या अंशापासून गणपतीची मूर्ती तयार होते आणि शेवटी निसर्गतःच ती विलीन होते. असे म्हंटले जाते की गणेश विसर्जनाच्या वेळेस विसर्जन हे फक्त मूर्तीचेच करायचे नसते तर आपल्यातील दुर्गुणांचेही करायचे असते.

हे ही वाचा:

ज्या कुटुंबानं तुम्हाला इतकी वर्ष भरभरून दिलं त्यांच्याशी गद्दारी केलीत; Ajit Pawar यांना Sanjay Raut यांचा टोला

संजय राऊतांचा हल्लाबोल, महाराष्ट्र लुटण्यासाठी अमित शाहांचे दौरे सुरु…

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss