spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर

आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा आज आणि उद्या असा दोन दिवसांचा असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बहुप्रतिक्षित असं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे.

आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा आज आणि उद्या असा दोन दिवसांचा असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बहुप्रतिक्षित असं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामधील शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण पार पडेल. हा प्रकल्प विविध कारणांमुळे रखडला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम –

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १६ आणि १७ सप्टेंबर या कालावधीत औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार, दि.१६ सप्टेंबर, रोजी दुपारी. २. ३० वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन होईल. पुढे दुपारी २.४५ वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन होणार आणि पुढे दुपारी ३.३० वा. शासकीय विश्रामगृह येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे मुख्यमंत्री शिंदे हे जातील दुपारी ४.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे आगमन आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण आणि राखीव असणार आहे. तर सायं. ०५.३० वाजता विद्यापीठ अधिसभा सदस्य विजय पाटील, यांचे कार्यालयास भेट देणार आहेत. पुढे संध्याकाळी ते ५. ४५ वाजता सिध्दार्थ गार्डन येथून मोटारीने तापडिया नाट्य मंदिराकडे ते रावण होतील आणि सायं ६. ०० वाजता मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व हैद्राबाद मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सव समिती आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : तापडिया नाट्य मंदिर, औरंगाबाद.) संध्याकाळी ६. ३० वाजता तापडिया नाट्य मंदिर, औरंगाबाद येथून मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे जातील आणि रात्री ७.१५ वाजता शासकीय विश्रामगृह, येथे मुकाम होईल

तर दुसऱ्या दिवशी शनिवार, दि.१७ सप्टेंबर, २०२२ रोजी सकाळी ०६. ३० वाजता शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद येथून मोटारीने सिध्दार्थ उद्यानाकडे जातील. सकाळी ७. ०० वाजता मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे (स्थळ : सिध्दार्थ उद्यान, औरंगाबाद.) सकाळी ७. १५ वाजता सिध्दार्थ उद्यान औरंगाबाद येथून मोटारीने विमानतळाकडे प्रयाण आणि सकाळी ७.३५ वाजता औरंगाबाद विमानतळ येथे आगमन आणि शासकीय विमानाने हैदराबाद विमानतळाकडे एकनाथ शिंदे जाणार आहेत.

हे ही वाचा:

PM Modi Birthday : ‘५६ इंच’ थाळी संपवा आणि जिंका ‘साडे आठ लाख’ रुपयांचं बक्षीस

नरेंद्र मोदी एक प्रभावशाली व्यक्तिमहत्व, वाचा प्रधान मंत्रींच्या संघर्षाचा प्रवास

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss