spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

गृहमंत्री अमित शाह सपत्नीक लालबाग राजाच्या चरणी लीन

सध्या मुंबईत गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. अशातच गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध असलेलं लालबाग गजबजून गेलं आहे.

सध्या मुंबईत गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. अशातच गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध असलेलं लालबाग गजबजून गेलं आहे. मुंबईतील लालबाग परिसरात असलेला लालबागचा राजा हा जगभरात प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारा राजा अशी लालबागचा राजाची ख्याती आहे. लाखो भाविक लालबागच्या राजाचे दर्शन करण्यासाठी येत असतात. लालबागमध्ये (Lalbaug) देश-विदेशातून भाविकांनी गर्दी केली आहे. एवढंच काय तर, अनेक राजकीय नेतेमंडळींनीही लालबागमधील गणपती मंडळांमध्ये (Lalbagh Ganapati Mandal) गणरायाच्या दर्शनासाठी हजेरी लावली आहे. लालबागमधील प्रसिद्ध मंडळांपैकी एक असलेलं लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातही गणरायाच्या दर्शनासाठी अनेक दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.

अश्यातच नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या लालबाग राजाच्या (Lalbaghcha Raja) चरणी लीन होण्यासाठी आज (सोमवारी) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पोहचले आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलारही उपस्थित होते. अमित शाह हे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आले आहेत. यावेळी मुंबई दौऱ्यानिमित्त आलेल्या अमित शाह यांनी आज सोमवारी ९ सप्टेंबर रोजी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांची पत्नीही उपस्थित होती.

गेल्यावर्षीही अमित शाह यांनी सहकुटुंब लालबाग राजाचे दर्शन घेतले होते. लालबागचा राजाला दाखल होण्यापूर्वी अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी भेट दिली होती. यावेळी त्यांनी लाडक्या गणरायाचे दर्शन घेतले. त्यासोबत अमित शाहांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरील निवासस्थानी असलेल्या गणपतीचे दर्शन घेतले. याआधी शरद पवारांनीही लालबागच्या राजाचे दर्शन घेतले होते. आज अमित शाह साधारण सकाळी ११.५५ च्या दरम्यान लालबागचा राजाच्या दर्शनासाठी आले. यावेळी त्यांनी गणरायांच्या मूर्तीला हात जोडून नमस्कार केला. त्यानंतर त्यांनी बाप्पााला नारळाचे तोरण अर्पण केले. तसेच त्याच्या चरणावर हळद, कुंकू आणि फुलंही वाहिली. यानंतर अमित शाह यांनी बाप्पााच्या चरणावर डोकं ठेवत आशीर्वाद मागितला.

हे ही वाचा:

Ganeshotsav 2024: एक वाटी गव्हाचे पीठ आणि झटपट मोदक तयार…

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना द्या खास शुभेच्छा!…

Ganeshotsav 2024: यंदाच्या गणपतीत बाप्पासाठी बनवा मूगडाळीचे पौष्टिक मोदक

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss