spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ganeshotsav 2024: कलियुगात श्रीगणेशाने घेतला कल्की अवतार? या मंदिरात कल्की अवताराची केली जाते पूजा

Ganeshotsav 2024: गणेशोत्सवाचा माहोल सर्वत्र दिसून येत आहे, कारण आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन घराघरांत झालेलं आहे. हिंदू धर्मात गणेशोत्सव हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. सर्वत्र उत्साह आणि चैतन्याचे वातावरण पाहायला मिळत आहे. देशभरात विविध ठिकाणी श्रीगणेशाची मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात. अनेक मंदिरांमध्ये काही धार्मिक घटना आहेत किंवा काही पारंपरिक आख्यायिका आहेत. परंतु एक असे मंदिर आहे जिथे श्रीविष्णूचा १०वा अवतार मानलेला कल्की हा अवतार आहे, त्या अवतारात गणपती बाप्पांची पूजा केली जाते. लाखो भाविक या मंदिरात दर्शनासाठी जात असतात.

कल्की गणेश मंदिर कुठे आहे ?
कल्की गणेश मंदिर हे मध्य प्रदेशात आहे. हे मंदिर मध्यप्रदेशाच्या जबलपूरमधील ( Madhya Pradesh) (Jabalpur) मदन महलच्या रतन नगरमध्ये ( Ratan Nagar) आहे. या मंदिराला सुप्तेश्वर गणेश मंदिर या नावानेही अनेक जण ओळखतात.

मंदिरासंबंधित काही गोष्टी
हे मंदिर असे एकमेव आहे ज्यात कल्की रूपातील गणेशाची पूजा केली जात आहे. या मंदिरातील गणेशाची मूर्ती ही २५ फूट विशाल खडकात विराजमान आहे. हा प्रचंड खडक सुमारे १०० चौरस फूट परिसरात आहे. असे म्हटले जाते की, जो भक्त या खडकाची सिंदुर लावून प्रदक्षिणा करतो आणि जो भक्त ४१ दिवस मंदिराजवळ दिवा लावून पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यामुळे या श्रद्धेमुळे अनेक भाविक दिवा लावण्यासाठी येत असतात.

मंदिरापर्यंत जाण्याचा मार्ग
कल्की गणेश मंदिरापर्यंत (Kalki Ganesh Mandir) पोहचणे सोपे आहे. मध्यप्रदेशातील कोणत्याही शहरातून जबलपूरला पोहचू शकतो. तसेच जबलपुरहून टॅक्सी, कॅब , आणि ऑटोच्या मदतीने मंदिरापर्यंत पोहचू शकतो. हे मंदिर मध्यप्रदेशच्या राजधानी भोपाळपासून सुमारे ३११ किमी इतके आहे. येथून गणेश मंदिरात रेल्वे , टॅक्सी किंवा बसने सहज पोहचता येते.

हे ही वाचा:

गृहमंत्री अमित शाह सपत्नीक लालबाग राजाच्या चरणी लीन

वारकरी संप्रदायाकडून समाज घडविण्याचे कार्य – CM Eknath Shinde

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss