Ganeshotsav 2024: गणपती बाप्पाचं आगमन आता सर्वत्र झालं आहे आणि भक्त पूरेपूर उत्सवाचा आनंद लुटत आहेत. देशात ठिकठिकाणी गणेशोत्सव निमित्त बाप्पाची पूजा-अर्चना करताना पाहायला मिळत आहे. तसेच अंबानी कुटुंबीयही (Ambani Family) गणेशोत्सव साजरा करताना मागे नाही, अंबानीचं घर म्हणजेच अँटिलियामध्ये (Antalia) बाप्पा विराजमान झाला, आणि दीड दिवसानंतर त्याचं विसर्जनही वाजत गाजत करण्यात आले.
नेहमीप्रमाणे अनेक दिग्गज व्यक्तींची उपस्थिती पाहायला मिळाली. काही महिन्यांपूर्वीच राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी (Radhika Merchant and Anant Ambani) यांचं लग्न झालं. त्यावेळेस अंबानी कुटुंबीयांची लूक्सची चर्चा होत होती. नेहमीप्रमाणेच यंदाही गणेशोत्सव (Ganesh Chaturthi 2024) दरम्यान अंबानी परिवारातील महिलांचे लूक्स चर्चेत आहेत. नीता अंबानी (Neeta Ambani) यांच्या लूक आणि सौंदर्याची सगळीकडेच चर्चा रंगत असते. तसाच गणेशोत्सव लूकही चर्चेत आहे. नीता अंबानी जेव्हा गणेशोत्सव लुकमध्ये मीडियासमोर आल्या तेव्हा त्यांचा लूक बघून सर्वच आश्चर्यचकित झाले. त्याचे कारण असे की, वयाच्या साठीतही त्यांचे सौंदर्य त्यांच्या सुनेला मागे टाकणारे आहे.
नीता अंबानी नेहमीच त्यांच्या सूनांशी आईसारखे लाड करताना पाहायला मिळतात. प्रत्येक कार्यक्रमांत त्या त्यांच्या स्वभावाची झलक मीडियाला दाखवून देतात. गणेशोत्सवातही मीडिया समोर येताना बाहेर पडत सून राधिका हीचा हात हातात घेऊनच आल्या. त्यावेळी त्यांची नेसलेली आकर्षक साडी लक्षवेधी ठरली. त्याचबरोबर त्यांचे सौंदर्य आणि मनमिळावू स्वभाव यांचे एकाच वेळी दिसून येत होते.
नीता अंबानींच्या सौंदर्याने सुनेला टाकले मागे –
नीता अंबानींच्या ऐश्र्वर्याशी तुलना आणि स्पर्धा करणे कोणालाही सहज शक्य नाही. परंतु त्यांचे ऐश्वर्यच नाही तर त्यांचे वयाच्या साठीत सुध्दा चिरतरुण सौंदर्य ही देखील एक चर्चेची मोठी बाब असते. कोणत्याही कार्य नीता अंबानी त्यांच्या स्टायलिश आणि फॅशनेबल लूक सदैव वाखडण्याजोगीच असते. त्यांचे आऊटफिट आणि त्यावर परिधान केलेले युनिक स्टाईलचे दागिने यात नेहमीच विविधता दिसून येते. गणेशोत्सवाचा नीता अंबानी यांच्या लूकने सून राधिका मर्चंट हिलाही मागे टाकले आहे. त्यांचे मोत्याचे दागिने आणि नवीन साडी त्यांच्या सौंदर्यात आणखी भर घालणारे ठरले आहे.
हे ही वाचा:
Ganeshotsav 2024: एक वाटी गव्हाचे पीठ आणि झटपट मोदक तयार…
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना द्या खास शुभेच्छा!…
Ganeshotsav 2024: यंदाच्या गणपतीत बाप्पासाठी बनवा मूगडाळीचे पौष्टिक मोदक