spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Nagpur Hit and Run Case: Chandrashekhar Bawankule यांच्या परिवाराचा संबंध नाहीये मग लपवाछपवी का चाललीय? :Sanjay Raut

Nagpur Hit and Run Case: शिवसेना उबाठा (Shivsena UBT) प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नागपूर हिट अँड रन प्रकरणावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यासह उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर चांगलीच तोफ डागली आहे. संजय राऊत यांनी आज (मंगळवार, १० सप्टेंबर) पत्रकार परिषद घेत, “नागपुर हिट अँड रन प्रकरणात बावनकुळे यांच्या परिवाराचा संबंध नाहीये मग लपवाछपवी का चाललीय?” असा सवाल विचारला आहे. नागपूर हिट अँड रन प्रकरणात चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे (Sanket Bawankule) याचे नाव समोर येत आहे, यामुळे आता राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी यावरून भाजपला लक्ष केले आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत यावेळी म्हणाले, “कोणाचा मुलगा आहे, कोणत्या पक्षाचा आहे याचा संबंध काय नाही, मुलगा चंद्रशेखर बानवकुळे यांचा असो किंवा अजून कोणत्या नेत्याचा असो , या राज्यात कायदा आहे? हिट अँड रन प्रकरण महाराष्ट्रात ऐवढी वाढत आहेत. मोठ्या नेत्यांची मुलं लोकांना नशेत गाडी चालवून मारत आहे. आणि मोठ्या नेत्यांची मुलं असल्याने त्यांच्या नावाची FIR सुद्धा नाही. या देशात कायदा एकच आहे तर फडणवीस गृहमंत्री आहेत तर त्यांनी सांगितलं पाहिजे नागपुर मध्ये हिट अँड रन केस झालीय ती गाडी कोणाची आहे, गाडी कोण चालवत होतं? गाडी चालवणाऱ्या ड्राईव्हरची अदलाबदल केली नेम प्लेट कोणी बदलली? बावनकुळे यांचा आणि त्यांच्या परिवाराचा यांच्याशी संबंध नाहीये मग ही चोरी चपाटी का केली ?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

ते पुढे म्हणाले, “दोन शेहजादे गाडी चालवत होते ते नशेत होते त्यांना वाचवलं आहे, हे समजल्यानंतर कायदा सुव्यवस्था उध्वस्त झाली आहे. फडणवीस ज्या शहरातून येतात त्या शहाराची अवस्था बघा, जर दुसऱ्या कोणत्या पक्षाच्या नेत्याचा मुलगा असता तर फडणवीस यांची फौजेने हल्ला केला असता. या अपघातातील दोन जखमी जीवाशी झुंजत आहे आणि नशेत गाडी चालवली त्यांच्या नावाची साधी एफआयआरसुद्धा नाही. जर गाडी बावनकुळे यांच्या मुलाची आहे किंवा त्यांची आहे आणि गाडी त्यांचा मुलगा चालवत होता सगळे पुरावे नष्ट केले. देवेंद्र फडणवीस राज्याच्या गृहमंत्री पदाला लायक नाही. जो पर्यंत या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि रश्मी शुल्का डीजी आहे तोपर्यंत कायदा सुव्यवस्था आणि फेर निकाल लागणार नाही. कायदा त्यांच्या इशाऱ्यावर नाचत आहे. लाहोरी बारचा सीसीटीव्ही फुटेज काढा,” असे ते म्हणाले.

“चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा विषय नाही आहे. या राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा कचरा झालेला आहे. एका बाजूला नरेंद्र मोदी सामान कायद्याचा उल्लेख करतात ना… ती गाडी बावनकुळे यांची आहे, गाडीने सहा गाड्यांना ठोकर मारली चार लोकं जखमी आहेत त्यातील दोन अत्यंत गंभीर आहे. गाडीचे मालक बावनकुळे यांचे चिरंजीव आहेत तर मग त्यांच नाव एफआयआर मध्ये का नाही? रंगसफेदी चाललेली आहे, फडणवीस यांनी खोटी शप्पथ घेतली आहे समान न्याय देण्याची,” असे ते यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

BJP चा अंतर्गत सर्व्हे आला समोर लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज; Rohit Pawar यांचा दावा

मी केलेल्या कामाचे श्रेय Goval Padvi यांनी घेऊ नये: Heena Gavit

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss