spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अलबत्या गलबत्या नाटकातील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची एक्सिट

विश्वविक्रमी बालनाट्य अर्थात ‘अलबत्या गलबत्या’ (Albatya Galbatya) हे चिमुकल्या प्रेक्षक वर्गाच्या चांगलंच पसंतीस उतरलं होतं. या नाटकाने बालरंगभूमीला पुन्हा एकदा एक नवीन जीवनदान दिले होते.

विश्वविक्रमी बालनाट्य अर्थात ‘अलबत्या गलबत्या’ (Albatya Galbatya) हे चिमुकल्या प्रेक्षक वर्गाच्या चांगलंच पसंतीस उतरलं होतं. या नाटकाने बालरंगभूमीला पुन्हा एकदा एक नवीन जीवनदान दिले होते. या नाटकात प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले (Vaibhav Mangale) यांनी साकारलेल्या चिंचि चेटकिणीच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. मात्र, आता वैभव मांगले यांनी या भूमिकेतून आणि या नाटकातून एक्झिट घेतली आहे.

अभिनेते वैभव मांगले सध्या बरेच चर्चेत आहेत. नुकताच येऊन गेलेला त्यांचा टाइमपास ३ सिनेमा असतो किंवा सध्या जी मराठी वरील ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ कार्यक्रमात ते साकारत असलेली चिंची चेटकीणीची भूमिका असो. शिवाय वैभव मांगले हे सातत्याने विविध विषयांवर भाष्य करत असतात. आज ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्याचे कारणही तसेच आहे. वैभवला ज्या नाटकाने प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली ते ‘अलबत्या गलबत्या’ हे नाटक त्याने सोडले आहे. याबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर देखील करण्यात आली आहे. त्या पोस्टमध्ये ते म्हणाले आहे, प्रिय रसिक प्रेक्षक आणि बालमित्रांनो मैत्रिणींनो मी चिंचि चेटकीणीचं काम सोडलं आहे. तरी जाहिरातीतला फोटो माझा आहे असे वाटून कदाचित माझी चेटकीण पाहायला याल आणि भ्रमनिरास होईल. तर सांगायचा मुद्दा हा आहे की, ‘ती मी नाहीच’.

 

View this post on Instagram

 

A post shared by #AlbatyaGalbatya (@albatyagalbatya)

 वैभव मांगले यांच्या पोस्टनंतर या नाटकाचे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत. सध्या निर्मात्यांनी नाटकासाठी नवी चिंची चेटकीण शोधली असून त्या अभिनेत्याचे नाव निलेश गोपनारायण असे आहे. नीलेशचे हे पहिलेच व्यावसायिक नाटक आहे. त्यामुळे वैभवच्या जाण्याने नाटकावर काय परिणाम होणार हे लवकरच कळेल. तसे दोन्ही कलाकार मेकप नंतर सारखेच दिसत आहेत. विशेष म्हणजे वैभव मांगले (Vaibhav Mangale) यांनी साकारलेली लोकप्रिय चेटकीण आणि निलेश गोपनारायण साकारत असलेली चेटकीण ही अगदी ‘सेम टू सेम’ दिसत आहे. दोन्ही कलाकारांचे चेटकिणीच्या पात्रातील फोटो पाहता त्यातील फरक देखील ओळखू येत नाहीये. नुकतीच या नाटकाच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा झाली. नाटकाची जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर वैभव मांगले यांना प्रेक्षकांकडून विचारणा होऊ लागली की, आम्ही येतोय नाटकाला, आम्हाला भेटू शकाल का? चाहत्यांच्या या विचारणेनंतर, दुसऱ्या एका अभिनेत्याला वैभव मांगले समजून प्रेक्षकांचा भ्रमनिरास होऊ नये, म्हणून वैभव मांगले यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.

हे ही वाचा:

Bhagwan Vishwakarma Pooja : भगवान विश्वकर्मा कोण आहेत? जाणून घ्या त्यांचे पूजन का केलं जाते

माझी तुझी रेशीमगाठ’ यामालिके संदर्भात निर्मात्यांनी घेतला महत्वाचा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss