spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नागपूर अपघातप्रकरणी Sushma Andhare पोचल्या नागपुरात, पोलीस स्टेशनमध्ये घुसून पोलीस अधिकाऱ्याला धरले धारेवर

Nagpur Car Accident: नागपूर हिट अँड रन प्रकरणात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा मुलगा संकेत बावनकुळे (Sanket Bawankule) याचे नाव समोर येत आहे, यामुळे आता राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी यावरून भाजपला (BJP) लक्ष केले आहे. एकीकडे विरोधक यावरून चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करत असतानाच आता शिवसेना उबाठा गटाच्या (Shivsena UBT) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी थेट नागपूर गाठले आहे. नागपूरमघील सीताबर्डी पोलीस स्टेशन गाठून त्यांनी थेट पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अपघातातील गाडीचा नंबर एफआयआरमध्ये दाखल का नाही? संकेत बावनकुळेंची वैद्यकीय तपासणी का केली नाही? असा सवाल त्यांनी यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना विचारला.

यावेळी माध्यमांशी संवाद साधत सुषमा अंधारे म्हणाल्या, “आतमध्ये डीसीपी आणि पीआय यांना काही प्रश्न विचारले तेव्हा ते म्हणाले की आमचा तपास सुरु आहे, जर तुमचा तपास सुरु आहे तुम्हाला कळलं आहे की गाडी कोणाची आहे तर तुम्ही सेक्शन वाढवत का नाही ? आरोपी अजून एक वाढवत का नाहीत ? त्यावर ते मौन आहेत. बावनकुळे यांची खरंच तपास निरपेक्ष व्हावी अशी इच्छा असेल तर तुम्हीच डीसीपीमधून आदेश द्यावेत की संकेत बावनकुळे यांचे नाव आरोपी म्हणून वाढीव वर्ग करा, अजून सेक्शन वाढवा हे सांगा. देवेंद्र फडणवीस एकच डायलॉग घेऊन बसले आहेत की राजकारण करु नका. संकेत बावनकुळे याने मित्रांसोबत दारू पिली, बीफ खाल्ले. अपघात झाल्यानंतर संकेत बावनकुळे याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, या प्रयत्नात रामदास पेठमध्ये त्याने पुन्हा तीन गाड्या ठोकल्या त्यातील एक गाडी जितेंद्र सोनकांबळे यांची होती. पोलिसांची गुन्हा नोंद करायची इच्छा नव्हती. ज्यांच्या गाड्याना नुकसान झालं परंतु विमा साठी म्हणू तक्रार घ्या तेव्हा तक्रार झाली. पोलीस निरीक्षक चंद्रकांत चकाटे काय लपवत आहे ? दोघांचं मेडिकल केलं, संकेतच मेडिकल का नाही ? गाडी एकच जण चालवत होता तर एकाचेच मेडीकल करायचे दोघांचे का केले ?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“यात गाडीचा पंचनामा केलेला नाही, कार ही फक्त 28 दिवस जुनी होती. संकेत बावनकुळे याची गाडी आहे हे पोलिसांना कळलंच नाही तरी बावनकुळे म्हणतात माझ्या मुलाच्या नावाची गाडी आहे हे त्यांनी स्वतः समोर येऊन सांगितलं आणि माझ्या मुलाची चौकशी करा. घटनेचा स्पॉट पंचनामा देखील केला नाही केला नाही. यामध्ये जखमींबाबत कुठीही वाच्यता केली नाही. विकास ठाकरे यांना सर्व माहिती होतं तर 36 तास व्यक्त व्हायला का लागले ? संकेत लाहोरी बारमध्ये मसाले दूध प्यायला गेला होता आणि बाकी सगळे दारु प्यायला गेले होते पण दूध पिलेल्या माणसाने आपल्या अडीज कोटीच्या गाडीची चावी प्रचंड दारु पिलेल्या माणसाकडे दिली ही चूक नव्हे का ? देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊ नका अजून पाच – पन्नास मेले तर काय फरक पडतो,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हे ही वाचा:

नागपूर अपघातप्रकरणावरून मविआ नेत्यांमध्येच जुंपली; ठाकरे गटाच्या Sushma Andhare आणि काँग्रेसचे Vikas Thakre यांच्यात नवा वाद

जर Mahavikas Aghadi चे सरकार आलं तर सगळ्या योजना बंद पडतील: Chandrashekhar Bawankule

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss