spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

महाराष्ट्राची Vidhansabha Election लवकरच…मतदार यादीत आपलं नाव कसे शोधायचे? जाणून घ्या सविस्तर

मतदार यादीत नाव असल्याशिवाय मतदानाचा हक्क बजावता येत नाही. त्यामुळे सर्वप्रथम मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही हे तपासून घ्या. मतदानापूर्वी ऑनलाईन पद्धतीने आपले नाव मतदार यादीत शोधणे अगदी सहज शक्य झाले आहे. चला तर मग जाणून घेऊया आपले नाव मतदार यादीत कसे शोधायचे.

लोकसभा निवडणुकीच्या जोरदार राजकीय संघर्षांनंतर संपूर्ण राज्याला वेध लागले आहेत ते म्हणजे विधानसभा निवडणुकीचे. सध्या हरियाणा, जम्मू काश्मीर राज्यांच्या विधानसभा निवडणूका जाहीर झालेल्या आहेत. महाराष्ट्राची विधानसभा निवडूक नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर करण्यापूर्वी निवडणूक आयोगाकडून पूर्वतयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील प्रत्येक नागरिकाने मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. तुमचे वय १८ वर्षे किंवा १८ वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही मतदानासाठी सज्ज असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे.

मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, आपले मतदान केंद्र नक्की कुठे आहे अशा अनेक अडचणींचा सामना ऐन मतदानाच्या दिवशी आपल्याला करावा लागतो. तुमच्याकडे मतदान कार्ड असेल आणि मतदार यादीत तुमचं नाव नसेल तर तुम्हाला मतदान करता येणार नाही. मतदार यादीत नाव असल्याशिवाय मतदानाचा हक्क बजावता येत नाही. त्यामुळे सर्वप्रथम मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही हे तपासून घ्या. मतदानापूर्वी ऑनलाईन पद्धतीने आपले नाव मतदार यादीत शोधणे अगदी सहज शक्य झाले आहे. चला तर मग जाणून घेऊया आपले नाव मतदार यादीत कसे शोधायचे.

मतदार यादीत आपले नाव कसे शोधयाचे?

मतदार यादीत आपलं नाव आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला प्रथम निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. https://localbodyvoterlist.maharashtra.gov.in/ObjectionOnClick/SearchName या महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवर भेट देऊन तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही हे पाहता येईल. या वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्हाला सर्च नेम यानुसार दोन पर्याय उपलब्ध होतील. तुमचं नाव नोंदवून त्याचबरोबर जिल्हा, मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्थेचे नाव नोंदवून तुम्हाला तुमचं मतदार यादीतील नाव तपासता येईल. याशिवाय आयडी कार्ड क्रमांक नोंदवण्याचा दुसरा पर्याय देखील उपलब्ध आहे. या ठिकाणी तुम्ही जिल्हा, मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्थेचे नाव आणि मतदार ओळखपत्र क्रमांक नोंदवून मतदार यादीतील नाव तपासून पाहता येईल.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टलवर तुम्ही तुमचं मतदार यादीतील नाव तपासून पाहू शकता. त्यासाठी https://electoralsearch.eci.gov.in/ या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. या वेबसाईटवर तीन पद्धतीचा वापर करून मतदार यादीतील नाव तपासून पाहता येईल.

  • पहिल्या पद्धतीत तुम्हाला तुमच्या मतदार ओळखपत्राचा क्रमांक नोंदवावा लागेल. त्यानंतर राज्य महाराष्ट्र निवडावं लागेल. यांनतर कॅप्चा कोड नोंदवून आपलं नाव तपासात येईल.
  • दुसऱ्या पद्धतीत मतदाराचं संपूर्ण नाव, जन्मतारीख, वय राज्य भाषा जिल्हा आणि मतदारसंघ यासह इतर माहिती नोंदवावी लागेल.
  • तिसऱ्या पद्धतीत मोबाईल क्रमांक नोंदवल्यावर तुम्हाला ओटीपी प्राप्त होईल. तो ओटीपी क्रमांक नोंदवल्यावर तुमचं मतदार यादीत नाव आहे की नाही हे पाहता येईल.
हे ही वाचा:

Malaika Arora Father Death: मलायकाच्या वडिलांचे नाव नेमके काय? दोघांच्या वयातील अंतर पाहून व्हाल चकित…

हा ‘रडतरौत’ फक्त फेकाफेकी करतो, खोटं बोलतो, Chitra Wagh यांची Sanjay Raut यांच्यावर आगपाखड

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss