spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

विरोधी पक्षाचे टीकास्त्र, Yamini Jadhav यांच्याकडून बुरख्याचे वाटप, राजकीय खेळीची सुरुवात

विधानसभा निवडणूक (Vidhansabha Elections)आता तोंडावर येऊन ठेपली आहे आणि त्यातच आता सर्व पक्षांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. शिंदे गटविरुद्ध ठाकरे गट असा आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सध्या पहायला मिळत असताना आता मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्या पक्षाच्या बॅनरखाली एक कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी यामिनी जाधव यांनी मुस्लिम महिलांना बुरखा वाटप केले. यामिनी जाधव यांनी केलेल्या या क्रियेमुळे आता विरोधकांना टीका करण्याची संधी लाभली आहे.

Image

मुंबईतील भायखळा विधानसभेमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांनी पक्षाच्या बॅनरखाली मुस्लिम महिलांना बुरख्याचे वाटप केले. लोकसभा निवडणुकीनंतर सध्या सर्वच पक्ष दलित आणि मुस्लिम वोट बँक आपल्याकडे वळवण्याच्या प्रयत्नात असल्याचे पाहायला मिळत आहे. याचा सर्वात मोठा फटका हा भाजप आणि शिवसेनेला बसल्याचे चित्र होते. अशातच आता यामिनी जाधव यांनी आपला भायखळ्याचा विभाग लक्षात घेऊन पुन्हा एकदा मुस्लिम समुदायाला खेचण्याचा प्रयत्न सुरू केला. यामिनी जाधव यांनी पक्षाच्या बॅनरखाली मुस्लिम महिलांना गुरखा वाटपाचा कार्यक्रम घेतला. पहिल्यांदाच भायखळा विधानसभेमध्ये मुस्लिम महिलांना बुरखा वाटण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यामुळे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मुस्लिम महिला उपस्थित होत्या.

यामिनी जाधव यांचा लोकसभा निवडणूक 2024 मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांच्यामुळे पराभव झाला होता. अरविंद सावंत यांनी पन्नास हजाराहून जास्त मत मिळवत यामिनी जाधव यांचा पराभव केला होता. त्यांना या विभागातील सर्वात जास्त मुस्लिम मतदान मिळाले होते. यामिनी जाधव जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये होत्या, त्यावेळी त्यांनी या ठिकाणाहून निवडणूक लढवली होती. तेव्हा पन्नास हजाराहून जास्त मते मिळवत त्यांनी काँग्रेसच्या मधु चव्हाण यांचा पराभव केला होता. पण त्यानंतर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र संपूर्ण चित्र उलटल्याचे पाहायला मिळाले. यामिनी जाधव आपला भायखळाचा गड राखण्यासाठी आता पुन्हा एकदा मुस्लिम समुदायाला त्यांच्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा रंगत आहे. याशिवाय पुन्हा एकदा शिवसेनेवर संधी साधू राजकारण केल्याचा गंभीर आरोप सुद्धा होताना दिसत आहे.

हे ही वाचा:

Malaika Arora Father Death: मलायकाच्या वडिलांचे नाव नेमके काय? दोघांच्या वयातील अंतर पाहून व्हाल चकित…

Ganeshotsav 2024: गौरी विसर्जन कोणत्या कालावधीत करायचे आणि कोणते नियम पाळायचे आहेत ते जाणून घेऊयात सविस्तर…

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss