काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. यावेळी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ‘जेव्हा योग्य वेळ येईल, देशात समानता येईल तेव्हा काँग्रेस आरक्षण संपवण्याचा विचार करेल. सध्या ती योग्य वेळ नाही,’ असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानावर आता विरोधकांनी चांगलीच आगपाखड केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह अनेक सत्ताधारी नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच भाजप कार्यकर्त्यांकडून राहुल गांधींविरुद्ध आंदोलनेदेखील करण्यात आली. अश्यातच आता धक्कादायक बातमी येत असून भाजप नेत्याने यावरून राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धाकी दिली आहे. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्याला प्रमाणात व्हायरल होत आहे. यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मोठे भाष्य केले आहे.
राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा व्हिडीओ काँग्रेसकडून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये दिल्ली भाजपमधील कार्यकर्ते राहुल गांधी यांच्या १० जनपथ निवास जवळ आंदोलनं करताना दिसत असून राहुल गांधी यांनी अमेरिकेत केलेल्या वक्तव्याची माफी मागताना दिसत आहेत. यादरम्यान भाजप नेता आणि माजी आमदार तरविंदर सिंह मारवाह (Tarwinder Singh Marwah) हा खुलेआमपणे राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देत असताना दिसत आहे. “‘राहुल गांधी, वेळीच सुधरा, नाहीतर भविष्यात तुमचीही आजीसारखीच अवस्था होईल.’ अश्या शब्दांत भाजप नेता धमकी देताना दिसतात आहे. यावरून आता राजकीय वातावरण तापले असून काँग्रेस नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. नाना पटोले यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देत, “मोदीजी, तुम्हाला देशात शांतता प्रस्थापित करायची असेल तर अशा खुले आम हत्या करण्याची धमकी देणाऱ्या गुंडांना वेळीच आवरा,” अश्या शब्दांत इशारा दिला आहे.
काय म्हणाले नाना पटोले?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावरून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून भाष्य करत ते म्हणाले, “‘राहुल गांधी, बाज आ जा नहीं तो आनेवाले टाईम में तेरा भी वही हाल होता जो तेरी दादी का हुआ’ ही धमकी देणारे हे महाशय म्हणजे दिल्ली भाजपा नेते आणि माजी आमदार तरविंदर सिंह मारवाह. भाजपच्या या नेत्याने काल आंदोलनादरम्यान खुलेआम राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी दिली. नरेंद्र मोदीजी पाहा तुमच्या सत्ताधारी पक्षाचा नेता चक्क विरोधी पक्षनेत्याला जीवे मारण्याची धमकी देत आहे. हीच का तुमची लोकशाही? हेच का तुमचं देशप्रेम?”
‘राहुल गांधी, बाज आ जा नहीं तो आनेवाले टाईम में तेरा भी वही हाल होता जो तेरी दादी का हुआ’
ही धमकी देणारे हे महाशय म्हणजे दिल्ली भाजपा नेते आणि माजी आमदार तरविंदर सिंह मारवाह. भाजपच्या या नेत्याने काल आंदोलनादरम्यान खुलेआम राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी दिली. @Narendramodi जी… pic.twitter.com/eu8foMRvAv
— Nana Patole (@NANA_PATOLE) September 12, 2024
“ज्या व्यक्तीच्या कुटुंबाचं देशाच्या स्वातंत्र्यात मोठं योगदान राहिलं आहे, अशा गांधी कुटुंबातल्या व्यक्तीला, विद्यमान विरोधी पक्षनेत्याला थेट संपवण्याची भाषा कशी वापरली जाते. जिथे आमचे नेते प्रेमाची गोष्ट करतात तिथे तुमचे नेते द्वेषाशिवाय काहीच बोलत नाही. यावर आता तुम्ही गप्प का? आणि तुमचा भारतीय जनता पक्ष झोपेचं सोंग घेऊन का बसला आहे.? या गंभीर घटनेवर आपण मौन बाळगू शकत नाही. द्वेषाचं विष पसरवणाऱ्या तुमच्या या नेत्यावर तुम्हाला कारवाई करावीच लागेल.मोदीजी, तुम्हाला देशात शांतता प्रस्थापित करायची असेल तर अशा खुले आम हत्या करण्याची धमकी देणाऱ्या गुंडांना वेळीच आवरा!” असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
विरोधी पक्षाचे टीकास्त्र, Yamini Jadhav यांच्याकडून बुरख्याचे वाटप, राजकीय खेळीची सुरुवात
तेरा भी वही हाल होता जो तेरी दादी का हुआ, Rahul Gandhi यांना BJP नेत्याने दिली जीवे मारण्याची धमकी