काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. यावेळी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ‘जेव्हा योग्य वेळ येईल, देशात समानता येईल तेव्हा काँग्रेस आरक्षण संपवण्याचा विचार करेल. सध्या ती योग्य वेळ नाही,’ असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानावर आता विरोधकांनी चांगलीच आगपाखड केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह अनेक सत्ताधारी नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच भाजप कार्यकर्त्यांकडून राहुल गांधींविरुद्ध आंदोलनेदेखील करण्यात आली. अश्यातच आता धक्कादायक बातमी येत असून भाजप नेत्याने यावरून राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धाकी दिली आहे. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्याला प्रमाणात व्हायरल होत आहे. यावरून आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी मोठे भाष्य केले आहे.
राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा व्हिडीओ काँग्रेसकडून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये दिल्ली भाजपमधील कार्यकर्ते राहुल गांधी यांच्या १० जनपथ निवास जवळ आंदोलनं करताना दिसत असून राहुल गांधी यांनी अमेरिकेत केलेल्या वक्तव्याची माफी मागताना दिसत आहेत. यादरम्यान भाजप नेता आणि माजी आमदार तरविंदर सिंह मारवाह (Tarwinder Singh Marwah) हा खुलेआमपणे राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देत असताना दिसत आहे. “‘राहुल गांधी, वेळीच सुधरा, नाहीतर भविष्यात तुमचीही आजीसारखीच अवस्था होईल.’ अश्या शब्दांत भाजप नेता धमकी देताना दिसतात आहे. यावरून आता राजकीय वातावरण तापले असून काँग्रेस नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत.बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देत, “राहुल गांधी यांच्या केसालाही धक्का लागला तर भाजप आणि मोदी सरकार जबाबदार असेल,” अश्या शब्दांत इशारा दिला आहे.
काय म्हणाले बाळासाहेब थोरात?
बाळासाहेब थोरात यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून याबाबत भाष्य केले आहे. यावेळी ते म्हणाले, “राहुल गांधी तुमचे हाल तुमच्या आजीसारखे करू” असे म्हणत दिल्लीतील भाजपचा नेता, माजी आमदार तरविंदर सिंह मारवाह ने लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. भाजप नेत्याकडून राजरोसपणे राहुल गांधी यांची हत्या करण्याची धमकी दिली जात आहे. हे अत्यंत गंभीर आहे.”
“राहुल गांधी तुमचे हाल तुमच्या आजीसारखे करू”
असे म्हणत दिल्लीतील भाजपचा नेता, माजी आमदार तरविंदर सिंह मारवाह ने लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
भाजप नेत्याकडून राजरोसपणे राहुल गांधी यांची हत्या करण्याची धमकी दिली जात आहे. हे अत्यंत… pic.twitter.com/xo8bSX8C2r
— Balasaheb Thorat (@bb_thorat) September 12, 2024
“राहुल गांधी दररोज भाजपचा खोटारडेपणा उघडा पाडत आहेत. त्यांची लोकप्रियता पंतप्रधानापेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे घाबरलेली भाजप आता राहुलजींच्या जीवावर उठली आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदी या धमकी देणा-या भाजप नेत्यावर कारवाई करणार का? राहुल गांधी यांच्या केसालाही धक्का लागला तर भाजप आणि मोदी सरकार जबाबदार असेल,” असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
तेरा भी वही हाल होता जो तेरी दादी का हुआ, Rahul Gandhi यांना BJP नेत्याने दिली जीवे मारण्याची धमकी