spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Manoj Jarange-Patil यांचा Mahayuti वर घणाघात, म्हणाले तुम्हांला आता…

सध्या सगळीकडे विधानसभा निवडणुकीचे (Vidhansabha Elections) वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच आता मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी लोकसभेप्रमाणेच येणाऱ्या विधानसभेत अनेकांचा हिशोब चुकता करण्यात येईल, असा इशारा दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे. राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पाठोपाठ महायोग देणे पण जागा वाटपाच्या फॉर्मुलाचे गणित जुळवायला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असताना मराठा आरक्षणाची धग कोणाला बसणारे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बिचाऱ्या गणपतीची शपथ कशाला घेता आता तुम्हाला तेवढा देव राहिला आहे का? दैवताचा शब्द कशाला वाहता? तुम्ही महाविकास आघाडीला कशाला प्रश्न विचारू? तुम्ही तुमच्या नेत्याला प्रश्न विचारा असा पलटवार मनोज जरांगे यांनी केला. विधानसभा अध्यक्ष (Vidhansabha) कडे मागणी केलेला अरे सत्तेकडेच मागवं लागेल. तुम्ही अधिवेशन कोणाला मागितलं, सरकारलाच मग आम्ही आरक्षण कोणाला मागणार सरकारलाच ना महाविकास आघाडीच्या माजी विधानसभा अध्यक्षांकडे का मागणी केली नाही अधिवेशन (Adhivsehan) बोलवा म्हणून? असा सवाल विचारत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी भाजप (BJP) नेत्यांवर टिकास्त्र उगारले.

‘चोराच्या उलट्या बोंबा’ अशी आता सध्याची परिस्थिती आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे बोलत आहेत आमदार बोलत नाहीत लोक म्हणतात, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) लय हुशार आहेत तेवढे हुशार आहेत का ते, याला फोडा त्याला फोडा हेच सध्या सुरु आहे. असे म्हणत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टोला लगावला आहे. उद्या निवडणुका घेतल्या तरी फसला चार महिन्याचे, निवडणुका घेतल्या तरी फसलात फडणवीस (Fadnavis) साहेब तुम्हाला तोडगा काढायला लागणार आहे. तुम्ही किती सरकारी आंदोलन उभे केले त्या राज्यात 15 दिवस आंदोलन उभे राहणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला आहे.

हे ही वाचा:

Malaika Arora Father Death: मलायकाच्या वडिलांचे नाव नेमके काय? दोघांच्या वयातील अंतर पाहून व्हाल चकित… Ganeshotsav 2024: गौरी विसर्जन कोणत्या कालावधीत करायचे आणि कोणते नियम पाळायचे आहेत ते जाणून घेऊयात सविस्तर…

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss