spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ढोल-ताशा मंडळांसाठी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, गणपती विसर्जनाला स्पीकर लावायचा की नाही?

सध्या संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सवाचा माहोल पाहायला मिळत आहे. गणेशोत्सव म्हटलं म्हणजे ढोल ताशांचा गजर आणि सध्याच्या पिढीला अभिप्रेत असणारे डीजे लाऊड स्पीकरचा आवाज. याच आवाजाच्या पार्श्वभूमीवर उत्सव काळात आवाजाची तीव्रता वाढण्यास बंदी आणावी, यासाठी राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल करण्यात आली होती. ध्वनी प्रदूषणाच्या याचिकेची दखल घेत हरित लवादाने गणेशोत्सव काळात ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी अटी ठेवल्या होत्या. या अटीनुसार आवाजाची तीव्रता वाढू नये, यासाठी नियम सुद्धा घालण्यात आले होते. पण या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज 12 सप्टेंबर रोजी सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत हरित लवादाच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. गणपती विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी एका दिवशी परवानगी देण्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने केला आहे.

ढोल ताशा पथकामध्ये 30 पेक्षा जास्त वादक नसावेत, असा आदेश हरित लवादाने दिला होता. या आदेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. हरित लवादाने 30 ऑगस्ट रोजी वादकांच्या संख्ये संदर्भात आदेश दिला होता. हरित लवादाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाकडून तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. हरित लवादाने ढोल-ताशा, साउंडच्या आवाजावर अटी लावल्या होत्या. त्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने एका दिवसासाठी मुभा दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे गणेश भक्तांना दिलासा मिळाला आहे.

हरित लवादाचा निर्णय जो आहे, त्यावर तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. म्हणजे 17 सप्टेंबर रोजी पुण्यात गणेश विसर्जनाच्या वेळी काहीच रेस्ट्रिक्शन नसणार आहेत. याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की, वर्षातून एक दिवस असतो, आणि त्यामध्येही तुम्ही ध्वनी प्रदूषणाच्या नावावर अटी लावल्या तर चुकीचा संदेश पसरवला जाईल. याचाच अर्थ येत्या 17 सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन जोरातच होईल, अशी माहिती वकील सिद्धार्थ शिंदे यांनी दिली आहे.

हे ही वाचा:

ST च्या फायद्यात वाढ, कोणत्या कारणांमुळे झाला एसटी महामंडळाचा नफा?

Jay Shah: जय शाह यांनी आयसीसीच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्याआधीच; केली मोठी घोषणा…

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss